राज्यसभेत रणकंदन : शरद पवारांसह विरोधक उपराष्ट्रपतींच्या भेटीला 

शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला.
Opposition leaders meet Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu
Opposition leaders meet Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu

नवी दिल्ली : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेचे कामकाजही बुधवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पण त्यापूर्वी राज्यसभेत शेवटी मोठा गदारोळ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप करत बाहेरून सभागृहात 40 हून अधिक जणांना आणल्याचा व महिला खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप केला. त्यानंतर गुरूवारी पवार यांच्यासह विरोधकांनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांटी भेट घेतली. (Opposition leaders meet Rajya Sabha Chairman Venkaiah Naidu)

पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे आदी मुद्यांवरून विरोधकांनी संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. एक दिवसही पूर्णवेळ सभागृह चालले नाही. राज्यसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही मोठा गदारोळ झाला. विमाविषयक विधेयकाला विरोध करत अनेक सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येत घोषणाबाजी करून लागले. त्यावेळी सभागृहात सुरक्षारक्षक बोलवण्यात आले होते. त्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. 

या प्रकारावर बोलताना शरद पवार यांनी बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गुरूवारी सर्व विरोधक पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यसभेत बुधवारी घडलेल्या घटनेनंतर पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले असून बुधवारच्या प्रकाराबाबत माहिती दिली. कोणत्याही चर्चेशिवाय सरकारने अनेक विधेयक मंजूर केली आहेत, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी सांगितले. 

काय म्हणाले शरद पवार?

पवार म्हणाले, मी माझ्या 55 वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असे कधीच पाहिलं नाही. महिला खासदारांवर हल्ला करण्यात आला. बाहेरून 40 हून अधिक पुरूष व महिलांना सभागृहात आणण्यात आलं. हे अत्यंत दुर्दैवी असून हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी टीका पवार यांनी केली. पवार यांच्यानंतर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा दावा केला. महिला सुरक्षारक्षकांनी विरोधी पक्षाच्या महिला सदस्यांना धक्काबुक्की केली तसेच त्यांचा अपमान केला. 

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, विरोधी खासदारांनी मला व संसदीय कार्यमंत्र्यांना चेंबरमधून बाहेर येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. हे दुर्दैवी आहे. विरोधी पक्षांच्या मनात काय होते, या पहायला मिळाले. त्यांनी पॅनेल चेअरमन, कर्मचारी व महासचिवांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही गोयल यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com