फडणवीस दादरा नगर हवेलीत जाऊन कडाडले...महाराष्ट्रातील खंडणीखोर सरकार तुम्हाला हवयं का?

शिवसेना दादरा नगर-हवेलीमध्ये मृत्यूच्या लाटेचे राजकारण करत आहे.
 Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

सिल्वासा : दादरा नगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर पोटनिवडणुक होत आहे. शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपचे उमेदवार महेश गावित यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.

 Devendra Fadnavis
इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार!

शिवसेना दादरा नगर-हवेलीमध्ये मृत्यूच्या लाटेचे राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाऊन सरकार स्थापन केले, असे हे संधीसाधू आहेत. शिवसेनेचा मुंबईतील इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केला. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचे घेतील आणि काम मुघलांचे करतील, अशी टीका फडणवीस यांनी शिवसेनेवर केली.

आपले भवितव्य बदलण्यासाठीही संधी आहे. जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, हे मोदींनी देशात करुन दाखवले. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जमा होतो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरे दिली जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

 Devendra Fadnavis
"जनाब राऊत तुम्हाला नबाव मलिकांच्या नजरेतूनच हिंदुस्थान पाहायचाय''

महाराष्ट्रात 10 लाख घरे दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहचत आहे. घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ मोदींनी पाहिला नाही. आता आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षात दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाही. ते 7 वर्षात मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालत होता. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com