पंजाबमध्येही अॉपरेशन लोटस? २५ - २५ कोटींची आँफर : केजरीवालांचा आरोप

Arvind Kejariwal : ईडी, सीबीआयची धाक दाखवून आमदारांना भीती घातली जात आहे.
Kejariwal
KejariwalSarkarnama

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा भाजपला धारेवर धरत, जोरदार हल्लाबोल केला आहे. नुकतंच गोव्यामध्ये काँग्रेसच्या ११ आमदारांपैकी ८ आमदार भाजपात दाखल झाले आहेत. यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेत्याचाही समावेश आहे. आता पंजाबमध्येही भाजपा आमच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप अरविंद केजरीवालांनी भाजपवर केला आहे.

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या निवडून आलेल्या 10 आमदारांना तब्बल 25 कोटीं रूपयांचे आमिष दाखवून त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) केला जात आहे, असा गंभीर आरोप भाजपवर केला गेला आहे. भाजपसारख्या पक्षामुळे देशातील लोकशाहीला धोका पोहचत आहे. लोकांचा कररूपी पैसा भाजप आमदार खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.अरविंद केजरीवाला म्हणाले, मंगळवारीच आमच्याकडे (१३ सप्टेंबर) यासंबधीची माहिती मिळाली होती, आमच्या 10 आमदारांना 25-25 कोटींचे आमिष दाखवून भाजपकडून खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Kejariwal
Medha Patkar : मी गुजरातची भावी मुख्यमंत्री नाही, तो केवळ अपप्रचार!

पंजाबमधील आमच्या दहा आमदारांना भाजपकडून सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना पैशाचे अमिष दाखवले गेले. त्यांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आपने पत्रकार परिषदेतून दावा केला आला आहे. भाजपसारख्या पक्षामुळे देशातील लोकशाहीला धोका पोहचत आहे. लोकांचा कररूपी पैसा भाजप आमदार खरेदी करण्यासाठी वापरत असल्याचे म्हटले आहे.

भाजपवर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले, 'भाजपच्यामार्फत वेगवेगळ्या राज्यात इतर सरकारे पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालू आहे. ईडी, सीबीआयची धाक दाखवून आमदारांना भीती घातली जात आहे. आमदार खरेदीसाठी नागरिकांचा पैसा वापरला जात आहे. यामुळेच देशात महागाईचा दर वाढत जात आहे.'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com