नवीन पेट्रोलियम मंत्र्यांची कमाल...पेट्रोल, डिझेल ऑगस्टपासून होणार स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीतून मार्ग काढण्यासाठी नवीन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनी तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी चर्चा केली होती.
OPEC countries agree to produce and supply more crude oil
OPEC countries agree to produce and supply more crude oil

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी नवीन पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी (OPEC) चर्चा केली होती. या चर्चेनंतर 'ओपेक'ने तेलाचा पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारात वाढवण्याचा निर्णय घेतला असून, खनिज तेलाचे भाव कमी होण्यास सुरवात झाली आहे. ऑगस्टपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. 

भारताचा हा खनिज तेलाचा जगातील मोठा आयातदार देश आहे. खनिज तेलाच्या दरवाढीचा भारताला मोठा फटका बसत आहे. तेल उत्पादक देशांची संघटना 'ओपेक'शी पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी वाढत्या भावाबद्दल चर्चा केली होती. याचबरोबर त्यांनी याविषयी संघटनेकडे चिंता व्यक्त केली होती. 'ओपेक'च्या प्रमुख सदस्य देशांशी फोनवरुन चर्चा करुन रास्त भावाने खनिज तेलाचा पुरवठा व्हावा, यासाठी पुरी यांनी मोहीम उघडली होती. 

पेट्रोलियम मंत्र्यांनी सुरू केलेल्या या मोहिमेमुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. 'ओपेक'ने तेल उत्पादन प्रतिदिन 4 लाख बॅरलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या काळात ही उत्पादन वाढ असेल. याचबरोबर संयुक्त अरब अमिराती, इराक आणि कुवेत या महत्वाच्या तेल पुरवठादार देशांनी भारताला जादा तेलपुरवठा करण्याचे मान्य केले आहे. तेल उत्पादक देशांनी पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात घसरण सुरू झाली आहे. यामुळे ऑगस्टपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पुरी यांनी आधी कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या पेट्रोलियम मंत्र्यांशी फोनवर चर्चा केली होती. नंतर त्यांनी 'ओपेक'मधील सर्वांत महत्वाचा सदस्य असलेल्या सौदी अरेबियाशी फोनवर चर्चा केली होती. सौदी अरेबियाचे युवराज व तेथील पेट्रोलियम मंत्री अब्दुल अजीज बिन सलमान अल सौद यांच्याशी पुरींनी चर्चा केली होती. दोन्ही देशांतील द्वीपक्षीय भागीदारी वाढवण्यासोबत खनिज तेलाच्या वाढत्या भावाबद्दल त्यांच्यात चर्चा झाली होती. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com