Salary Hike : एक वर्षाची सुट्टी, वेतनवाढ, तीन लाखांची मदत; जन्मदर वाढवण्यासाठी राज्यसरकारची मोठी घोषणा

सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी जर दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर त्यांना दुप्पट वेतनवाढ करण्याची घोषणा केली आहे.
Salary Hike News
Salary Hike News Sarkarnama

Big Announcement by Sikkim Government to Increase Birth Rate : एकीकडे देशात जन्मदर कमी करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी राजकीय पक्ष करत आहेत. मात्र, भारतातील एक राज्य लोकसंख्या वाढवण्यासाठी राज्यातील महिलांना प्रोत्साहन देत आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाम यांनी मकर संक्रातीला राज्याची लोकसंख्या वाढावी यासाठी मोठी घोषणा केली आहे.

सिक्कीमची लोकसंख्या 7 लाखांपेक्षा कमी आहे. सिक्कीममध्ये आतापर्यंत ३८ महिला आयव्हीएफद्वारे गर्भवती झाल्या आहेत. सिक्कीमच्या लोकसंख्येत वाढ करण्यासाठी या घोषणेत सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांनी जर दुसऱ्या बाळाला जन्म दिला तर त्यांना दुप्पट वेतनवाढ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय आणखीही सुविधा देण्यात येणार आहेत.

सिक्कीममधील लोकसंख्या कमी होत चालली आहे. अलीकडच्या काळात प्रजनन दर खूपच कमी आहे. प्रजनन दर वाढवण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Salary Hike News
World Economic Conference : मुख्यमंत्री शिंदेंनी दावोसमधून आणले 84 हजार कोटींचे प्रकल्प; पुण्याच्याही वाट्याला बरंच काही

- दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला कोणत्या सुविधा मिळणार?

आई होणाऱ्या सरकारी महिलेला 365 दिवसाच्या सुट्टीची घोषणा सरकारने केली आहे.

बाळाच्या वडिलांना 30 दिवसांची सरकारी सुट्टी

फक्त सरकारी महिला कर्मचारीच नाही तर बाळाला जन्म देणाऱ्या सर्वसामान्य महिलांनाही सरकार मदत करणार

महिलेला बाळ होण्यासाठी वैद्यकीय अडचणी येत असतील तर सरकार IVF सेंटर तयार करून दवाखान्यासाठी 3 लाख रुपये खर्च करणार

- मूल जन्माला आल्यावर मिळणार या सुविधा?

सिक्कीममध्ये मूल जन्माला आल्यावर अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. राज्यातील महिलांना एक वर्षाची प्रसूती रजा, तर वडिलांना ३० दिवसांची रजा देण्यात आली आहे. राज्यातील लोकांना अपत्य प्राप्तीसाठी प्रोत्साहन मिळावे आणि राज्याची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे.

- सिक्कीम सरकाने काय तयारी केली आहे?

सिक्कीम सरकार महिलांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी अनेक योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्याला दुसरे मूल झाल्यास तिला वेतनवाढ दिली जाईल, असा प्रस्ताव राज्य सरकारने ठेवला आहे. तिसरे अपत्य झाल्यास महिला कर्मचाऱ्याला दोन वेतनवाढीचा प्रस्ताव आहे. एवढेच नाही तर सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा आणत आहे. त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल.

- IVF साठीही सरकारी मदत

सिक्कीमच्या हॉस्पिटलमध्ये आयव्हीएफ सुविधा सुरू झाली आहे. सीएम तमांग म्हणाले की, राज्यात आयव्हीएफ सुविधा सुरू करण्यात आली आहे जेणेकरून गर्भधारणा होत नसलेल्या महिलांनाही मूल होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. IVF च्या माध्यमातून महिला माता झाल्यास त्यांना 3 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in