Imran Khan : माजी पंतप्रधानांची लोकप्रियता अजूनही कायम : तीन तासात जमविले ५०० कोटी

Imran Khan : महापुरातून सावरण्यासाठी पाकिस्तानला पैशाची गरज असून पाकिस्तान सरकारने जगभरातील नेत्यांना मदतीचे आवाहन केले आहे.
Imran Khan
Imran KhanSarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) इतिहासातील सर्वात महाभयंकर महापूर आला आहे. सध्या देशातील ९० टक्के भागात पूरस्थिती असून ६६ जिल्ह्यांमध्ये मदत व बचावकार्य जारी आहे. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे आलेल्या महापुरात आतापर्यंत लहान मुलांसह 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो लोकांचे संसार वाहून गेले असून लोक बेघर झाले आहेत.

महापुरातून सावरण्यासाठी पाकिस्तानला पैशाची गरज असून पाकिस्तान सरकारने जगभरातील नेत्यांना मदतीचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान खान (Imran Khan) यांनी काल मदतीचे आवाहन केले असता काही तासांतच अब्जावधी रुपये जमा झाले. त्यामुळे इम्रान खान यांची लोकप्रियता अजूनही कायम असल्याचे दिसते.

पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी इम्रान खान यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी तीन तासांत ५ अब्ज रुपये (पाकिस्तानी) गोळा केले. इम्रान खान यांनी ट्विट करून या निधीची माहिती दिली असून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहे.

Imran Khan
Jacqueline Fernandez : दोनशे कोटी खंडणी प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स

इम्रान खान आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे आभार मानतो. काल रात्री त्यांनी मोठे मन दाखवत पाकिस्तानातील नागरिकांसाठी देणगी दिली. केवळ तीन तासांच्या प्रयत्नातून आम्ही ५ अब्ज रुपये जमा केले," रॉयल नवाबचे मालक आणि सीईओ मोहंमद वकास यांनी इम्रान खान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत १ लाख पौंडांची मदत दिली.

गेल्या १५ दिवसांपासून पाकिस्तानात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं देशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकसंख्या महापूरानं प्रभावित झाली आहे. पाकिस्तानातील सिंध, स्वात, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात महापूरानं थैमान घातलं असून त्यामुळं रस्ते, पिकं आणि पूल वाहून गेले आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यापासून पूरामुळं एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com