आजोबांच्या श्राद्धाला बारबाला; गोळीबार करून नातवांचा जल्लोष

गोळीबार प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे.
Crime

Crime

Sarkarnama

लखनौ : गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशात (UP) कुठलाही आनंदोत्सव असो किंवा मिरवणूक यामध्ये गोळीबार करून जल्लोष करण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शस्त्रांचे प्रदर्शन आणि शस्त्र जवळ बाळगण्याचा हल्ली मोठेपणा मिरवला जात आहे. मात्र, यामुळे उत्साहाच्या भरात केलेला गोळीबार इतरांच्या जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar) घडला असून चक्क आजोबांच्या श्राद्धाच्या जल्लोषासाठी नातवांनी बारबाला नाचवल्या व एका हातात रायफल आणि दुसऱ्या हातात बंदूकीने गोळीबार करत आनंद साजरा केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत एकाला अटक केली.

<div class="paragraphs"><p>Crime  </p></div>
DCP- 25 हजार, PI- 85 हजार, PSI-1500 : पोलिसांच्या हप्त्याची पोलखोल!

काही दिवसापुर्वी बिहार येथील मिथिलेश यादव आणि राजेश यादव यांच्या आजोबांचा मृत्यू झाला होता. आजोबांच्या श्राद्धाचा जल्लोष करण्यासाठी नातवांनी चक्क त्या रात्री बारबालांनाच नाचायला बोलावले होते. या जल्लोषात नाचतांनी मग्न झालेल्या नातवांनी बेभान होऊन जल्लोषी गोळीबार केला.आजोबांचे दोन्हीही नातवंड हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर चांगलाच व्हायरल झाल्याने पोलिसांना जाग आली आणि त्यांनी स्वत:हून या घटनेची दखल घेत तपास सुरु केला आहे.

येथील पोलिस अधिक्षक अरविंद कुमार यांनी येथे आजोबांच्या श्राद्धासाठी बारबालांचा डान्स आयोजित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्हिडीओ नीट पाहिल्यानंतर अनधिकृत शस्त्रातून गोळीबार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन नातवंडामधील राजेश हा कुख्यात गुन्हेगार असून त्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. दोघांना सुद्धा याआधी अनेकदा तुरुंगात जावे लागत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मिथिलेशला बेड्या ठोकल्या मात्र, राजेश फरार होण्यात य़शस्वी झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

<div class="paragraphs"><p>Crime  </p></div>
खेड तालुक्यात भर चौकात तरुणाचा गोळ्या घालुन खून..

दरम्यान, पोलिसांना राजेश आणि मिथिलेश यांच्या घरातून अवैध शस्त्रास्त्र सापडली आहेत. त्यांच्या घरातून बंदूक, जिवंत काडतुसंही मिळाली असून ती जप्त केली आहेत. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या परिसरात असे प्रकार सर्रास होत असून सरस्वती पूजेच्या नावाखालीही अनेक गुन्हेगार बारबालांना बोलावून शस्त्रांचे प्रदर्शन करतात. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. यामुळे अश्या प्रवृत्तीच्या लोकांना फावते, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com