Supreme Court hearing : शिंदे गटाच्या युक्तीवादावर, घटनापीठाचा महत्त्वाचा सवाल...

Supreme Court : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.
Supreme Court hearing
Supreme Court hearingSarkarnama

Shivsena News : राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल युक्तीवाद करत आहेत.

कौल आपल्या युक्तीवादात म्हणाले, राजकीय पक्षाचे अस्तित्व विधिमंडळ पक्षावर अवलंबून असते. वेगळा झालेला गट हाच खरा पक्ष आहे. निवडणूक आयोगानेही त्याला मान्यता दिली. खरा गटनेता कोण आहे? विधानसभा अध्यक्ष ठरवतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयात जे अधिकारच नाहीत, ते ठरवण्यास सांगितले जात आहे.

Supreme Court hearing
Thackeray vs Shinde : "सर्वोच्च न्यायालयाच्यावर एक न्यायालय, सत्तासंघर्षाचा निवाडा तिथेच होईल!" ; घटनातज्ञ बापटांचे मत!

पक्षाचा गटनेता विधानसभा अध्यक्ष, राज्यपालांच्या संपर्कात असतो. त्याचे कामच ते असते. विधिमंडळात गटनेताच पक्षाचे प्रतिनिधित्व करत असतो.

केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष या सर्व संवैधानिक संस्थांना बायपास करुन निर्णय रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. हे योग्य नसल्याचे, कौल म्हणाले.

कौल यांच्या या युक्तिवादावर घटनापीठाने सवाल केला ''तुमचे म्हणणे मान्य केले तर विधानसभा अध्यक्षांच्या मदतीने कुणीही पक्ष ताब्यात घेऊ शकतो का?'' यावर नीरज कौल म्हणाले, सर्व संवैधानिक संस्था बाजूला ठेवून न्यायालय निर्णय घेऊ शकत नाही. विधानसभेतील गटनेताच पक्षाची भूमिका ठरवत असतो. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचा अधिकार असतो.

Supreme Court hearing
Supreme Court Hearing: हरिश साळवेंचा जोरदार युक्तीवाद; राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवता येत नाही...

राज्यपालांनाच बहुमत चाचणीचा अधिकार आहे. आयोगाला पक्ष कुणाचा, हे ठरवण्याचा अधिकार आहे. सर्व संवैधानिक यंत्रणा बाजूला ठेवून आम्ही निर्णय घेतो, असे न्यायालय म्हणू शकेल का? असा सवाल कौल यांनी केला. स्वायत्त संस्थांचे अधिकार बायपास करण्यासाठीच ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com