Supreme Court : ठाकरे गटाचे वकील सिंघवींच्या युक्तीवादावर सरन्यायाधीशांची महत्त्वपूर्ण टिपण्णी

Supreme Court hearing On Shivsena : ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा जोरदार युक्तीवाद
Supreme Court Hearing
Supreme Court HearingSarkarnama

Supreme Court hearing : सत्तासंघर्ष प्रकरणात आज ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) युक्तिवाद करणार आहेत. बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर कपिल सिब्बल यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद संपला आहे. आता २ वाजता ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करणार आहेत.

सिब्बलांचा युक्तिवाद संपला...

या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचे संरक्षण करण्याचा आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले आहेत. मात्र, त्याच प्रकरणाइतकेच हे प्रकरण महत्त्वाचे व प्रभाव पाडणारे आहे. हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण आहे, जेव्हा लोकशाहीचे भवितव्य ठरवले जाणार. मला खात्री आहे, की न्यायालयाने जर मध्यस्थी केली नाही, तर आपण आणि आपली लोकशाही धोक्यात येईल. कोणतेच सरकार अशाप्रकारे टिकू दिले जाणार नाही. या आशेवर मी युक्तिवाद संपवतो, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा, आपल्या युक्तीवादाचा असा भावनीक शेवट, कपिल सिब्बल यांनी केला आहे.

Supreme Court Hearing
Supreme Court : सिब्बलांच्या युक्तीवादाचा भावनिक शेवट; न्यायालयाकडे केली 'ही' महत्त्वाची मागणी

लंचब्रेकनंतर न्यायालयात अनेक घटना घटल्या आहेत. ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, नेत्याची नियुक्ती विधीमंडळ पक्षाकडून केली जाते, असा युक्तिवाद करता येणार नाही. त्यातून संसदीय लोकशाही धोक्यात येईल. आपल्याला दहाव्या शेड्यूलमध्ये परत जावे लागेल. दहाव्या शेड्यूलमध्ये दोन घटक असतात. एक म्हणजे निषिद्ध नकारात्मक कोड- तुम्ही काय करू नये. पण एक सकारात्मक कोडही आहे. दहावे शेड्यूल काय करते ते म्हणजे ते नकारात्मक आणि सकारात्मक यांच्यात संतुलन राखते, असा जोरदार युक्तीवाद सिंघवी यांनी केला.

सिंघवी आपल्या युक्तीवादत पुढे म्हणले, 10 व्या सूचीआधी आयाराम, गयारामचे राज्य होते. न्यायालयाने 10 व्या सुचीचा विचार करावा. तसेच शिंदे गटाने राजीनामा दिला नाही. थेट उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणला. शिंदे गटाने 10 व्या सूचीचे उल्लंघन केले आहे. कुणाच्यातरी कुशीत बसून तुम्ही पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. बंड केल्यानंतर 21 जूनलाच निवडणूक आयोगाकडे का गेले नाही? थेट सुरत गाठले?

Supreme Court Hearing
Supreme Court : सिब्बलांच्या युक्तीवादावर शिंदे गटाचा आणि मेहतांचा जोरदार आक्षेप; न्यायालयात काय घडले?

सरन्यायाधीशांची टिपण्णी

अशा पद्धतीने आमदार पक्षातून बाहेर पडत स्वतंत्र गट बनवू लागले तर 10 व्या सूचीचा उपयोगच राहणार नाही. मग प्रत्येक बंडखोर हेच म्हणेल की मी राजीनामा देणार नाही. इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. सिंघवींच्या युक्तिवादावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी टिपण्णी केली. ते म्हणाले, इतर पक्षात विलीन होणे, हा पर्याय शिंदे गटाकडे नाही आहे. कारण त्यांचा दावा आहे आम्हीच शिवसेना आहोत. ते इतर पक्षात विलिन झाले असेत तर त्यांची शिवसेना म्हणून असलेली ओळख संपली असती. त्यामुळे त्यांच्यासाठी दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय नव्हता. त्यांचे म्हणणे होते की आमचा पक्षाध्यक्षांवर विश्वास राहिलेला नाही आहे, अशी महत्त्वाची टिपण्णी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in