Old Pension Scheme : जुन्या पेंशनबाबत मोठी माहिती समोर : केंद्रातल्या 'या' कर्मचाऱ्यांना योजना लागू होणार!

EPFO : केंद्र सरकारला न्यायालयाचे आदेश..
Old Pension Scheme
Old Pension SchemeSarkarnama

Old Pension Scheme : देशात जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरु करण्यावरुन राजकीय नेत्यांमध्ये टिका टिपण्णी होत आहे. सद्या असलेली नवी पेन्शन योजना (NPS) रद्दबातल करून जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून देशभरातील कर्मचारी करत आहेत. काँग्रेसशासित काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे.

Old Pension Scheme
Old Pension Scheme News: रघुराम राजन म्हणतात, जुनी पेन्शन योजना धोक्याची

जुनी पेन्शन योजना आता काँग्रेसशासित छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व आपचे सरकार असलेल्या पंजाबमध्ये लागू करण्यात आली आहे.सत्तेत आल्यास जुनी पेंशन योजनाबाबत लागू केले जाईल, मध्य प्रदेश राज्यात माजी मुख्यमंत्री व आताचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी सत्तेमध्ये येताच जुनी पेन्शन लागू करण्याची शिफारस केली होती. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रातल्या सरकारनकडून कोणतेही सकारात्मक उत्तर दिलेले नाही. केंद्रातले अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ही जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत पूर्ववत सुरु करण्याबाबत मागील दिवसांमध्ये संसदेत निवेदन केले होते.

Old Pension Scheme
Old Pension Scheme : काँग्रेसने भाजपला घेरलं; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर...

दरम्यान, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील (CAPF) सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजने अतर्गत लाभ मिळणार आहे. याबाबत पुढील आठ आठवड्यांमध्ये मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यासंदर्भात आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना अंतर्गत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. न्यायालयाने केंद्राला आठ आठवड्यांच्या मुदतीत यासंदर्भात सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Old Pension Scheme
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत फडणवीसांचं महत्त्वाचं विधान!

कार्यालयीन निवेदन नाकारले :

केंद्रीय वित्त मंत्रालयालचे 2003 ची अधिसूचना आणि पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचे 2020 चे ऑफिस मेमोरंडम (OM) उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले आहे. 1 जानेवारी 2004 च्या जाहिरातीनुसार, केंद्रीय निमलष्करी दलात नियुक्त झालेल्या जवानांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com