Chandigarh Crime|वसतीगृहात विद्यार्थींनीचे आक्षेपार्ह व्हिडीओ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न

Chandigarh Crime| एका मुलीने ६० मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून तरुणांना पाठवले.
Chandigarh Crime|
Chandigarh Crime|

चंदीगड : चंदीगड विद्यापीठातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विद्यापीठातील वसतीगृहात राहणाऱ्या एका मुलीने 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवून तरुणांना पाठवल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर काही मुलींना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित विद्यार्थींनीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसतीगृहातील एका मुलीने ६० मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून तरुणांना पाठवले. गेल्या अनेक दिवसांपासून ती हा प्रकार करत होती. तरुणांनी हे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने एकच गोंधळ उडाला. रात्री अडीच वाजताच्या सुमारास वसतूगृहातच विद्यार्थींनीनी मोठा गोंधळ केला.

Chandigarh Crime|
Ratnagiri Politics|आदित्य ठाकरेंनी शंंभर कोटी घेतले; रामदास कदमांचा गौप्यस्फोट

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, हे व्हिडीओ व्हायरल झाल्याने 8 मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. संतप्त विद्यार्थ्यांनी चंदीगड विद्यापीठाला घेराव घालत 'वी फॉर जस्टिस' अशी घोषणाबाजी सुरु केली. पण व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीवर हल्ला होऊ नये म्हणून तिला हॉस्टेलच्या एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलं होतं.

विद्यार्थीनींच्या गोंधळानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं बंदोबस्त तैनात केला. सुरक्षा रक्षकाने मुख्य गेट बंद केलं. पण संतप्त विद्यार्थ्यांनी पीसीआर वाहनांवर हल्ला केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. प्रकरण वाढत असल्याने पोलीस प्रशासनाने तुर्तास कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्टेलमधील एक मुलगी मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून तरुणाला पाठवायची. मुलींचे हे तरुण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायचा. शिमला येथील रहिवासी असलेला हा तरुणाने मुलींचे हे व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केले. पण त्यांचे असे हे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्याचे पाहून हॉस्टेलमधील तरुणींना धक्काच बसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com