नुपूर शर्मांबद्द्ल आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; काश्मीरी युट्यूबरला अटक

Nupur Sharma| ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Nupur Sharma case
Nupur Sharma case Twitter/@ANI

Nupur Sharmma latest news

नवी दिल्ली : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. असे असताना नुपूर शर्मा यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने एक युट्यूबरला पोलिसांनी अटक केला आहे. पण नुपूर शर्मांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण अडचणीत आल्याचे लक्षात येताच फैजलने तातडीने हा व्हिडिओ काढून टाकला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या यांच्याविरोधात देशभरात हिंसाचार उफाळला आहे. शर्मा यांना सतत धमक्याही मिळत आहेत. हे प्रकरण सुरु असताना काश्मीर खोऱ्यातील एका युट्यूब फैजल वाणी याने शर्मांबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. पण, वाद वाढल्याने फैजलने तो व्हिडिओ काढूनही टाकला. मात्र या व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी फैजलला अटक केली. कारवाईने घाबरलेल्या फैजलने तात्काळ माफी मागत यावर स्पष्टीकरणही दिले आहे. आपण चुकून हा व्हिडिओ बनवला असून माझ्यामुळे जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला माफ करा, असे म्हणत फैजलने माफी मागितली आहे.

Nupur Sharma case
शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना धमक्या; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

कोण आहे फैजल?

फैजल वाणीचे यूट्यूबवर डीप पेन फिटनेस नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनेलवर तो ज्ञान, मनोरंजन, फिटनेस आणि इतर संदेशांचे व्हिडिओ शेअर करत असतो. जून २०२० मध्ये फैजलने त्याचे हे यूट्यूब चॅनल सुरू केले. याशिवाय फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही फैजल चांगलाच सक्रिय असून त्याचे हजारो फॉलोअर्स देखील आहेत.

काय आहे प्रकरण?

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद टोकाला गेल्याने यावर शर्मा यांनी ट्विट करत जाहीर माफी मागितली. 'आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर ते वक्तव्य मी मागे घेते, असं त्यांनी म्हटलं आहे. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पण हा वाद वाढल्यानंतर भाजपने (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले.

भाजपने नुपूर शर्मा यांच्याप्रमाणेच नवीन कुमार जिंदाल यांनाही निलंबित केले आहे. त्यांनी ट्विटवर वादग्रस्त पोस्ट केली होती. दोन्ही नेत्यांमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या होत्या. शर्मा आणि जिंदाल यांच्यामुळे या वादात भर पडली होती. याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com