Odisha Train Accident : ओडीशा रेल्वे अपघात पोहचला सर्वोच्च न्यायालयात; चौकशीची मागणी..

PIL in Supreme Court on Odisha train accident : निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी व्हावी..
PIL in Supreme Court on Odisha train accident :
PIL in Supreme Court on Odisha train accident : Sarkarnama

Odisha News : ओडिशातील बालासोर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघातासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये या प्रकरणाची तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. (PIL in Supreme Court on Odisha train accident)

यासोबतच या समितीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश असावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय कवच नावाच्या ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम (ATP) बाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणीही जनहित याचिकेत केली आहे.

ओडिशा येथील बालासोर रेल्वे अपघातात 288 प्रवासी मृत्यूमुखी तर आणि एक हजारापेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. रेल्वे अपघात इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात आहे. या भीषण रेल्वे अपघातावर आता विरोधकांनी सरकारला घेरले असून, सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. तर हा विषय आता न्यायालयातही पोहचले आहे.

ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू आहे :

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेनंतर बुलडोझर आणि क्रेनच्या सहाय्याने रात्रभर रेल्वे रुळांवरून रेल्वेचे खराब झालेले डबे हटवण्यात आले. यासोबतच रुळांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे, जेणेकरून पूर्व आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मुख्य ट्रंक लाईनवर रेल्वेसेवा पूर्ववत करता येईल.

रेल्वे अधिकाऱ्यांनी आज ही माहिती माध्यमांना दिली. अपघातादरम्यान विखुरलेल्या विद्युत लाईन आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे कामही सुरू असल्याचे, अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी पहाटे अपघातस्थळी भेट दिली.

जखमींपैखी अनेकांना डिस्चार्ज :

दरम्यान ओडीशा बालासोर आणि इतर स्थानिक रुग्णालयात सुरुवातीला दाखल झालेल्या अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कटक, भुवनेश्वर आणि कोलकाता यासह इतरही काही रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश मृतदेह भुवनेश्वरमधील केंद्रात हलवण्यात आले आहेत.

कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी दि. २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीला धडकली आणि तिचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. हा खूप भीषण अपघात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com