Odisha News : धक्कादायक : पोलिसांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी आरोग्यमंत्र्यांवर झाडल्या गोळ्या अन् ..

Odisha Health Minister Attack Naba Das News : नाबा दास असे या आरोग्यमंत्र्यांचे नाव आहे.
Odisha Health Minister Attack Naba Das News
Odisha Health Minister Attack Naba Das News sarkarnama

Odisha Health Minister Attack Naba Das News : ओडिशामध्ये आज (रविवारी) आरोग्यमंत्र्यांवर अज्ञात हल्लेखोऱ्यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहेत.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाबा दास असे या आरोग्यमंत्र्यांचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Odisha Health Minister Attack Naba Das News
Satara News : अमित ठाकरेंना 'हा' परफ्यूम भेट देत उदयनराजे म्हणाले, "आता मोठ्या माणसासारखे.."

नाबा दास हे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारात ब्रजराजनगर येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. काही संशयितांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.

या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. हल्लेखोर हे पोलिसांच्या वेशात होते. नाबा दास यांच्या छातीत ४ ते ५ गोळ्या लागल्याचे सुत्रांनी सांगितले. नब दास या क्षेत्रातील एक प्रभावशाली नेते मानले जातात.

कोण आहेत नब किशोर दास..

  1. 2004 मध्ये नाबा दास यांनी ओडिशाच्या झारसुगुडा मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता.

  2. त्यांनी 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

  3. 2014 मध्येही ते काँग्रेसकडून विजयी झाले. 2019 च्या निवडणुकीत ते या जागेवरून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

  4. 2015 साली विधानसभेच्या अधिवेशनात नब किशोर दास सभागृहातच अश्लिल व्हिडिओ पाहताना दिसून आले होते. त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष निरंजन पुजारी यांनी त्यांना आठवडाभरासाठी निलंबित केले होते.

  5. नाबा दास हे ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com