Congress : भाजप नेत्यांचं भाकित खरं ठरलं; मुर्मूंना मत दिल्याचं काँग्रेस आमदारांनं केलं जाहीर

द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार आहेत.
Congress MLA Mohammed Moquim Latest News
Congress MLA Mohammed Moquim Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना देशभरातील लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाल्याचे आता स्पष्ट झालं आहे. मुर्मू या आदिवासी समाजातील महिला असून त्या निवडून आल्यास देशाची मान उंचावेल. त्यामुळे काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपकडून आवाहन करण्यात आल होतं. तसेच सद्सद्विवेकबुध्दीला स्मरून विरोधातील अनेक आमदार-खासदार मुर्मू यांना मतदान असं भाकित भाजप (BJP) नेत्यांकडून करण्यात आलं होतं. आता हे भाकित खरं होताना दिसत आहे. (Presidential Election News)

ओडिशातील काँग्रेसचे (Congress) आमदार मोहम्मद मुकीम (Mohammed Moquim) यांनी आपण मुर्मू यांनाच मतदान केल्याचे उघडपणे सांगितलं आहे. त्यामुळे युपीएतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसलाच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षातील आणखी काही आमदार व खासदारांनी मुर्मू यांना मतदान केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Congress MLA Mohammed Moquim Latest News
एकामागोमाग एक झटके बसल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिंदे-फडणवीसांकडे धाव

माध्यमांशी बोलताना मुकीम म्हणाले, 'मी काँग्रेसचा आमदार आहे. पण तरीही एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. आपल्या मातीसाठी काहीतरी करण्याचा विचार करून मी त्यांना मत दिलं.' मुर्मू या ओडिशाच्या असल्याने येथील आणखी काही लोकप्रतिनिधींनी त्यांना मतदान केलं असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेस व राष्ट्रवादीतील काही आमदार मुर्मू यांना मतदान करतील, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काही अपक्ष आमदार व काँग्रेसच्या आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं होतं. त्याची पुनरावृत्ती राष्ट्रपती निवडणुकीतही होईल, असाही दावा केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com