Tawde Committee Report : महाराष्ट्रासह 'या' तीन राज्यांत भाजप खासदारांची संख्या घटणार : पक्षाने नेमलेल्या समितीचा अहवाल

या समितीने देशभरातील भाजपच्या राजकीय ताकदीचा लोकसभेच्या दृष्टीकोनातून अंदाज घेतला आहे.
Vinod Tawde Committee
Vinod Tawde CommitteeSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रासह तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) खासदारांची (MP) संख्या मोठ्या प्रमाणात घटणार, असा अहवाल माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawade) समितीने पक्षश्रेष्ठींना सादर केला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अहवाल तावडेंनी सादर केला, त्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे. त्यातून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. (Number of BJP MPs will decrease in these three states including Maharashtra : Tawde Committee)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी भाजपकडून माजी मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने देशभरातील भाजपच्या राजकीय ताकदीचा लोकसभेच्या दृष्टीकोनातून अंदाज घेतला आहे. त्यात काही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Vinod Tawde Committee
Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

तावडे समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये भाजच्या लोकसभेच्या जागा घटण्याची शक्यता आहे. यातील महाराष्ट्र आणि कर्नाटकात भाजप व त्यांच्या मित्रपक्षाच्या मदतीचे सरकार आहे. बिहारमध्ये मात्र यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्यासोबत सरकार स्थापन केले आहे. या तीनही राज्यात भाजपचे संख्याबळ घटणार असल्याचे खुद्द पक्षाने नेमलेल्या समितीने म्हटले आहे.

Vinod Tawde Committee
Ajit Pawar News : चर्चा अजित पवारांची; पण काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या गळाला?

महाराष्ट्रात मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीला ४२ जागा मिळाल्या होत्या. त्यात आता दुहेरी आकड्यात घट होणार असल्याचे तावडे समितीने म्हटलेले आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे जास्तीत जास्त २२ ते २५ खासदारच निवडून येतील, असे तावडे कमिटीने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे काम पाहता महाराष्ट्रात भाजपचे २५ च्या वर खासदार जाणार नाहीत, असेही त्यात सांगितले आहे, त्यामुळे भाजपने ऑपरेशन लोटस सुरू केले आहे.

Vinod Tawde Committee
Dhananjay Munde News : ‘सगळं काही ठीक आहे, परफेक्टली वेल’ : अजितदादांना भेटलेल्या धनंजय मुंडेंचे सूचक विधान

दरम्यान, कर्नाटकात तर विधानसभा निवडणुकीतही भाजप हरणार असा अंदाज येत आहे. त्यातच लोकसभेलाही भाजपला फटका बसणार, हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील विविध चाचण्यांचा अहवाल भाजप विरोधात आहे, त्यामुळे भाजपला महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील बड्या नेत्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com