काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर? अजित दोवाल तातडीनं अमित शहांच्या भेटीला

काश्मिरी पंडितांसह सरकारी कर्मचाऱ्यांची खोरे सोडण्यास सुरूवात
काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर? अजित दोवाल तातडीनं अमित शहांच्या भेटीला
Ajit Doval and Amit Shah Sarkarnama

नवी दिल्ली : जम्मू- काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) पंडित आणि अल्पसंख्याक हिंदू समुदायाला लक्ष्य करून दहशतवाद्यांकडून हल्ले होच आहेत. यामुळे खोऱ्यात दहशतीचे वातावरण आहे. यातच सरकारी कर्मचारी आणि अन्य समाज घटकांनी काश्मीर खोरे सोडायला सुरूवात केली आहे. काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर चालल्याची भीती विरोधक व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल (Ajit Doval) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची काल (ता.2) भेट घेतली. यावर आजही शहा उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत.

नॉर्थ ब्लॉक येथे झालेल्या या बैठकीत अमित शहांनी काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह हे या वेळी उपस्थित होते. मागील काही दिवसांत दहशतवाद्यांकडून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे काश्‍मिरी पंडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काश्मीरमधील सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.

मागील १५ दिवसांत दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांचा गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. या हल्ल्यांमुळे काश्मीर खोऱ्यातील हिंदू दहशतीखाली आहेत. ते हे खोरे सोडून पलायन करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. आज (ता.३) याच विषयावर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार आहे. यात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा सहभागी होणार आहेत.

Ajit Doval and Amit Shah
मुख्यमंत्र्यांची खुर्ची अखेर वाचली! विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय

बँक व्यवस्थापकाची हत्या

दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना ताजी आहे. दहशवाद्यांनी 31 मे रोजी जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात कुलगाम येथे एका शिक्षिकेसह तिघांची हत्या केली होती. त्याआधी १८ मे रोजी उत्तर काश्‍मीरच्या बारामुल्ला येथील दारूच्या दुकानावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पोलीस कॉन्स्टेबल सेफुला कादरी, टीव्ही कलाकार अमरीन भट्टचीही हत्या करण्यात आली होती.

Ajit Doval and Amit Shah
मोदी सरकारचा मोठा निर्णय : गॅस सिलिंडरची सबसिडी बंद; केवळ एकच अपवाद

बिगरकाश्मिरी मजूरही टार्गेट

काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगचे प्रकार वाढत चालले आहेत. काल (ता.2) सकाळी दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकाची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर रात्री बडगाम जिल्ह्यात दोन बिगरकाश्मिरी मजुरांवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले आहेत. बडगामच्या मगरेपोरा भागामध्ये दोन मजुरांवर हा गोळीबार करण्यात आला यात एकाच्या खांद्याला तर दुसऱ्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in