Andhra Pradesh New Capital: आता अमरावती नाही, विशाखापट्टनम असेल आंध्रप्रदेशची नवी राजधानी, वाचा इनसाईड स्टोरी

Jagan Mohan Reddy: टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू सरकारवर आंध्र प्रदेशातील विद्यमान वायएसआर काँग्रेस सरकारने जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता.
YS Jagan Mohan Reddy
YS Jagan Mohan ReddySarkarnama

Andhra Pradesh News: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी मोठी मोठी घोषणा केली आहे. यापुढे अमरावती नाही तर विशाखापट्टनम(Visakhapatnam) ही आंध्र प्रदेशची नवी राजधानी असेल, अशी घोषणा जगन मोहन रेड्डी यांनी केली आहे. आज दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत त्यांनी याची घोषणा केली.

यावेळी बोलताना रेड्डी म्हणाले की, आगामी काळात आंध्र प्रदेशची राजधानी बनणार असलेल्या विशाखापट्टणममध्ये मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करण्यासाठी आलो आहे. येत्या काही महिन्यांत मी विशाखापट्टणम ही आमची राजधानी असेल. मी देखील लवकरच तिथे शिफ्ट होणार आहे.

YS Jagan Mohan Reddy
Threatening Call to Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धमकीचा कॉल

राजधानी बदलण्याचे कारण काय?

जगनमोहन रेड्डी सरकारच्या आधी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारच्या काळात 2015 मध्ये अमरावती राजधानी बनवण्यात आली होती. पण आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्य वेगळी झाल्यानंतर हैदराबाद ही सामायिक राजधानी बनवण्यात आले. त्यानंतर आंध्र प्रदेशला मर्यादित कालावधी 2024 पूर्वी नव्या राजधानीची घोषणा करावी लागली. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू टीडीपी सरकारवर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. अमरावती हे त्याचे प्रमुख केंद्र होते.

टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू सरकारवर आंध्र प्रदेशातील विद्यमान वायएसआर काँग्रेस सरकारने जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. ज्यामध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. रेड्डी सरकारने या घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली होती. मात्र, चंद्राबाबू नायडू यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com