'आता हे अण्णा हजारेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत आहेत'

AAP : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.
arvind-kejriwal-and-modi Latest News
arvind-kejriwal-and-modi Latest NewsSarkarnama

Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये (AAP) संघर्ष बघायला मिळत आहे. रोजच राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झडत आहेत. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

केजरीवाल म्हणाले की, ते (BJP) लिकर धोरणात घोटाळा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत होते. मात्र सीबीआयने घोटाळा झाला नसल्याचे सांगितले आहे. लोक त्याचं ऐकत नाहीत. म्हणून ते आता अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Arvind-kejriwal-and-modi Latest News)

arvind-kejriwal-and-modi Latest News
बावनकुळेंच्या बारामती दौऱ्यावर फडणवीस म्हणाले, भाजपचं मिशन बारामती नसून...

केजरीवाल म्हणाले की, आम्ही कोणत्याही तपासासाठी तयार आहोत. सीबीआयने सर्व तपास पूर्ण केला केला असून मनीष सिसोदिया यांना 14 तास चौकशी केली. त्यांनी त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मात्र त्यांच्या लॉकरमध्ये काहीही सापडले नसून त्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचा दावा त्यांना केला आहे. आता सीबीआयच्या तपासातून काहीही निष्पन्न झाले नसून त्यात कोणतेही राजकारण करू नये, त्यांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांला दिल्लीतील आमदार कसे विकत घ्यायचे होते. याचा तपास व्हायला हवा पाहिजे. जर आम्ही यापासून पळ काढत नाही तर ते का काढत आहेत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

arvind-kejriwal-and-modi Latest News
बिहारपाठोपाठ मणिपूरमध्येही भाजपला धक्का ; आमदार काढणार पाठिंबा

दरम्यान, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या लिकर धोरणावर मुख्यमंत्री केजरीवालांना पत्र लिहिले होते. या पत्राबाबत अण्णा हजारे म्हटले होते की, त्यांनी (मुख्यमंत्री केजरीवाल) प्रत्येक वॉर्डात दारूची दुकाने उघडली आणि वयोमर्यादा 25 वर्षांवरून 21 वर्षे केली आहे. ते दारूला प्रोत्साहन देत असून मी त्यांना पहिल्यांदाच त्याविरोधात पत्र लिहिले आहे. जेव्हा मी विरोध करत होतो तेव्हा ते मला त्यांचे गुरू म्हणायचे, आता त्या भावना कुठे गेल्यात?, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com