मी राष्ट्रीय राजकारणात, महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीसच करणार!

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालेल.
मी राष्ट्रीय राजकारणात, महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीसच करणार!
tawade-fadnavisSarkarnama

दिल्ली : मी आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय राहणार असून महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीसच करणार असल्याचे भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. तसेच मी महाराष्ट्राचाच आहे, जिथे गरज असेल, तेव्हा उभा राहणार असे आश्वासनही त्यांनी दिले. राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तावडे यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

विनोद तावडे म्हणाले, दिल्ली आणि अन्य राज्यांची समन्वयाची जबाबदारी माझ्याकडे असेल. राष्ट्रीय टीममधे संधी मिळाली याचा आनंद आहे. २०१९ ला तिकिट कापल्यानंतर पक्षाचे काम केले. पक्ष देईल ते काम करण्याची वृत्ती होती, त्यामुळेच मला ही संधी मिळाली. आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमचा भाग झालो आहे. आता माझी जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालेल. राज्यात माझे योगदान मागितले जाईल, तेव्हा नक्कीच देईल.

tawade-fadnavis
"२६/११ हल्ल्यात परमबीर सिंगानी दहशतवाद्यांना मदत केली, कसाबचा मोबाईलही गायब"

तीन कृषी कायदे रद्द केले म्हणजे भाजप सरकार घाबरले का, या प्रश्‍नावर विनोद तावडे म्हणाले, "देशाच्या हिताचे वाटले म्हणून ''कायदे मागे घेण्यात आले आहेत. तसेच पंकजा मुंडे या नाराज आहेत, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार का या प्रश्‍नावर उत्तर देताना ते म्हणाले, ''पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आवश्‍यकता आहे, असे वाटत नाही".

tawade-fadnavis
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार

कालच्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जावून भेट घेतली. यानंतर माध्यमांमधून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजप-मनसे युतीची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबात तावडे यांना विचारले असता राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट ही त्यांच्या नव्या घराच्या पार्श्वभुमीवर झाली असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.

विनोद तावडे यांनी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरही टिका केली. ते म्हणाले, काँग्रेस स्वबळावर लढणार, असे पटोले म्हणतात, कारण पक्ष नामशेष होण्याची भीती काँग्रेसला वाटते म्हणून ते स्वबळावर लढवणार आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in