गुडन्यूज! वर्षाला ३ LPG सिलेंडर मिळणार मोफत; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Goa Government | Free LPG Gas : सरकारने केली आश्वासनाची पूर्ती
Goa Free LPG Cylinder News, Free LPG cylinder in Goa
Goa Free LPG Cylinder News, Free LPG cylinder in GoaSarkarnama

पणजी : गोव्यात (Goa Government) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि त्यांचे मंत्रिमंडळ काल शपथबद्ध झाले. यानंतर पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत भाजप सरकारने आपल्या सर्वात मोठ्या आश्वासनाची पूर्ती केली आहे. यानुसार गोव्यात आता वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. याशिवाय मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषण मसुद्यालाही मंजुरी दिली आहे. (LPG Cylinder News)

मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर ही योजना अधिसूचित केली जाईल. यासाठी उत्पन्नाची मर्यादा व अन्य तपशील ठरवण्यात येत आहेत. एप्रिलपासून ही योजना लागू केली जाणार आहे. संकल्पपत्रात दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता केली जाणार आहेत. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेले वचन आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Goa Free LPG Cylinder News, Free LPG cylinder in Goa
कोल्हापूर महापालिका होणार १०० प्रभागांची : सतेज पाटलांचे संकेत

दरम्यान निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने सत्तेत आल्यास वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्यात आले होते. वर्षासाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून ३ हजार रुपये, सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार, अशी प्रमुख अश्वासने असलेला जाहीनामा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com