काँग्रेस अध्यक्ष पदासाठी राहुल गांधी नाही, तर 'या' नेत्याचे नाव सर्वात पुढे

Congress President Election : गांधी परिवारातील कुणीही निवडणुकीत उमेदवार नसल्याची चर्चा.
Congress Party symbol
Congress Party symbolSarkarnama

दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्षपदाची (Congress President ) निवडणुक वेगळ्या वळणावर आली आहे. अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांची नावे आघाडीवर होती. मात्र आता गांधी परिवारातील कुणीही (Gandhi Family) निवडणूकीत उमेदवार नसल्याची चर्चा आहे. यामुळे राहुल गांधी स्पर्धेत नसणार हे स्पष्ट आहे. खासदार शशी थरुर यांचे नाव आता सर्वात पुढे असल्याची चर्चा होत आहे.

थरुर यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपण इच्छुक असल्याचे आधीच सांगितले आहे. ते अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. कॉंग्रेसचे अध्यक्षपद हे तब्बल 25 वर्षांपासून गांधी परिवाराकडेच राहिले आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कालावधीनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी परिवाराच्या बाहेरील व्यक्ती बसणार का? हे पाहणे महत्तवपूर्ण ठरणार आहे.

Congress Party symbol
'तो' फोटो माध्यमात व्हायरल झाल्याने टि्वट केले, म्हात्रेंचं स्पष्टीकरण

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुढील महिन्यात पार पडणार आहे. मात्र आता निवडणूकीच्या प्रक्रियेची सुरवात झाली. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अर्जांचे वितरण सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी थरूर यांच्याकडून उमेदवारी अर्जाची मागणी झाल्याचे समजत आहे.

Congress Party symbol
उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का : पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

पक्षामध्ये काही बाबतीत संघटनात्मक पातळावर बदल होण्याची गरज आहे, अशी मागणी थरूर यांनी विद्यमान अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यांच्या या मागणीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथन आणि मनीष तिवारी यांनीही समर्थन दिले होते. आता प्रत्यक्षात निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच या बाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in