उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा जगाला आठवडाभरात दुसरा धक्का

उत्तर कोरिआचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी जगाला आणखी एक धक्का दिला आहे.
Kim Jong Un
Kim Jong Un File Photo

न्यूयॉर्क : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने जगाला आणखी एक धक्का दिला आहे. सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्यानंतर आठवड्याच्या आतच उत्तर कोरियाने बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. मागील वर्षी कोरियाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी करून मोठा धक्का दिला होता.

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी केल्याला उत्तर कोरियासह जपानने दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघासह फ्रान्स, आयरिश रिपब्लिक, जपान, ब्रिटन आणि अल्बानिया या देशांनी एकत्र येऊन नुकताच उत्तर कोरियाला इशारा दिला होता. विभागातील स्थिरतेला धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले होते. उत्तर कोरियाने याला न जुमानता या कारवाया सुरूच ठेवल्या आहेत. यामुळे आगामी काळात उत्तर कोरियासोबतचे इतर देशांसोबतचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे (South Korea) विभाजन झाल्यानंतर निर्माण झालेला वाद अद्याप शमलेला नाही. हा 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी किम जोंग याने मागील वर्षी दोन्ही देशांदरम्यान हॉटलाईन सुरू करण्याचे जाहीर केले होते. दोन्ही देशांतील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे सूतोवाच करीत त्याने शांतीचे गोडवे गायले होते. मात्र, त्याने सातत्याने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेणे सुरू ठेवले आहे.

Kim Jong Un
सायना हैदराबादमध्ये तर सिद्धार्थ चेन्नईत अन् तपास करणार महाराष्ट्र पोलीस!

मागील वर्षी किम जोंग याने जगाला मोठा धक्का दिला होता. उत्तर कोरियाने त्यावेळी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला होता. हॉसाँग-8 असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. उत्तर कोरियाने लष्करी विकासाची पंचवार्षिक योजना बनवली आहे. यात पाच अतिशय महत्वाच्या शस्त्रास्त्र यंत्रणा विकसित केल्या जाणार आहेत. यातीलच एक असलेल्या हॉसाँग-8 ची आता यशस्वी चाचणी घेण्यात आली होती.

Kim Jong Un
कॅप्टन अमरिंदरसिंग हॉकी स्टिकने आणणार काँग्रेसला जेरीस!

मागील वर्षी किम जोंग यांची बहीण किम यो जोंग यांनीही दक्षिण कोरियाशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचे संकेत दिले होते. यानुसार उत्तर कोरियाने दक्षिण कोरियासमोर चर्चेचा हात पुढे केला होते. याचे दक्षिण कोरियानेही स्वागत केले होते. यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच किम जोंग उन हे वारंवार क्षेपणास्त्रांची चाचणी करुन सगळ्यावर पाणी फेरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in