देशभरात ओमिक्रॉनचा प्रसार पण ईशान्य भारतात एकही रुग्ण नाही

ओमिक्रॉन (Omicron) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.
देशभरात ओमिक्रॉनचा प्रसार पण ईशान्य भारतात एकही रुग्ण नाही

Omicron

Sarkarnama

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराने आता डोके वर काढलं आहे. देशातील ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या आता 415 वर पोचली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. अद्याप ईशान्य भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

महाराष्ट्रानंतर दिल्लीत 79, गुजरात 43, तेलंगण 38, केरळ 37 आणि तमिळनाडू 34 रुग्ण आढळले आहेत. नाताळ सणाच्या वेळीच ओमिक्रॉनचा जगभर कहर वाढू लागल्याने अनेक देशांनी निर्बंध घातले आहेत. भारतातही अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहे. महाराष्ट्राने जमावबंदीसह अनेक निर्बंध लागू केले आहेत. भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरियाना या राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. दिल्लीनेही काही निर्बंध लागू केले आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>
कृषी कायदे पुन्हा आणले जाऊ शकतात! केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिले संकेत

डेल्टाच्या जागी आता ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे तिसरी लाट (Third Wave) पुढील वर्षाच्या सुरवातीला येईल, असा अंदाज आहे. ओमिक्रॉन हा अतिशय वेगाने संसर्ग होणारा आहे. यामुळे केंद्रासह राज्यांच्या आरोग्य यंत्रणा धास्तावल्या आहेत. केंद्र सरकारही यामुळे खडबडून जागे झाले आहे. अनेक राज्यांनी निर्बंध घालण्यास सुरवात केली आहे. दिल्ली सरकारने नाताळ आणि नववर्षाच्या जाहीर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron</p></div>
ममतांना गोव्याचं गणित जमेना! निवडणुकीआधी पाच नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ओमिक्रॉन रुग्णसंख्या आता 415 झाली आहे. ओमिक्रॉनचे आतापर्यंत 115 रुग्ण बरे झालेले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 115 रुग्ण आहेत. यानंतर दिल्ली 79, गुजरात 43, तेलंगण 38, केरळ 37, तमिळनाडू 34 अशी रुग्णसंख्या आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 7 हजार 189 नवीन रुग्ण सापडले. यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 47 लाख 79 हजार 815 वर पोचली आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 387 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत एकूण 4 लाख 79 हजार 520 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 77 हजार 32 वर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.