पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण? कैलाश विजयवर्गीय म्हणाले...

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण भाजपकडून आतापर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल स्पष्ट करण्यात आलेले नाही.
No chief ministerial face will be projected in West Bengal Assembly elections says Kailas vijayvargiy
No chief ministerial face will be projected in West Bengal Assembly elections says Kailas vijayvargiy

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण भाजपकडून अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल  हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. याबाबत पश्चिम बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी महत्वपुर्ण घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीदरम्यान पक्षाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचेही नाव जाहीर केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजपकडून पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी यांना नामोहरम करण्यासाठी तृणमुल काँग्रेसच्या आमदारांना गळ घातली जात आहे. त्यामध्ये त्यांना यशही मिळत असल्याने ममता दीदींची डोकेदुखी वाढत चालली आहे. 

तसेच आगामी निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण असेल, याचीही उत्सुकता लागली आहे. याविषयी बोलताना विजयवर्गीय म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी कोणताही चेहरा समोर आणला जाणार नाही. निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व व आमदार मुख्यमंत्री कोण असेल, हे ठरवतील.

दरम्यान, तृणमुल काँग्रेसची पडझड सुरूच असून बुधवारी आणखी एका आमदाराने पक्षाला रामराम ठोकला. शांतीपुरचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तृणमुलची चिंता वाढू लागली आहे. पक्षाला लागलेली गळती थांबविण्यात ममता दीदींना यश येताना दिसत नाही. पक्षातील मोठे नेते भाजप जाऊ लागल्याने निवडणुकीत तृणमुलला सत्ता टिकविण्यासाठी खुप परिश्रम करावे लागणार असल्याचे चिन्ह आहे.

भाजप माओवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक...

पश्चिम बंगालमध्ये दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. तृणमुलच्या एका खासदाराने भाजपची तुलना कोरोनाशी केली होती. भाजप कोरोनापेक्षा जास्त खतरनाक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप हा पक्ष माओवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक असल्याची टीका केली. तसेच पक्षांतर करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ''आपण रोज कपडे बदलतो, विचारसरणी नाही. ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे,'' असे त्या म्हणाल्या.

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com