निवडणुकीत त्रास देणाऱ्या चिराग पासवनांना नितीशकुमारांचा जोरदार झटका...

पासवान यांच्याकडे एकही आमदार ठेवला नाही..
chirag paswan-nitishkumar
chirag paswan-nitishkumar

पाटणा ः बहुजन समाज पक्षा (बसप)च्या सर्वेसर्वा मायावती आणि लोकजनशक्ती पक्षा (एलजेपी)चे अध्यक्ष चिराग पासवान यांना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा झटका दिला. या दोन्ही पक्षांचे एकमेव आमदारांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करीत संयुक्त जनता दला (जेडीयू)ची कास धरली.

‘बसप’चे आमदार जामा खान यांनी ‘जेडीयू’त प्रवेश करताना नितीश कुमार हे द्रष्टे नेते असल्याचे म्हटले आहे. ‘एलजेपी’चे एकमेव आमदार राजकुमारसिंह यांनीही नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. नितीश कुमार हे स्वतः मुस्लिमांचे पाठिराखे असल्याचे असल्याचा दावा करीत असले तरी बिहारमध्ये गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘जेडीयू’चा एकही मुस्लीम उमेदवार विजयी झाला नव्हता. भाजपशी युती केल्याने निवडणुकीत त्यांचा तोटा झाल्याचे राजकीय क्षेत्रात मानले जात आहे. अशा वेळी कैमूर मतदारसंघातील जामा खान यांनी ‘बसप’तून बाहेर पडत ‘जेडीयू’त प्रवेश केला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

चिराग पासवान बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएची साथ सोडून स्वतंत्रपणे निवणूक लढवली होती. नितीशकुमार यांना अडचणीत आणण्यासाठीच चिराग यांनी हे पाऊल उचलले होते. आपला विरोध हा भाजपला नसून नितीशकुमारांना आहे, असे ते जाहीरपणे सांगत होते. मोठ्या आशेने त्यांनी सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांचा एकच आमदार निवडून आला. तो आमदारही आता नितीशकुमारांच्या तंबूत दाखल झाला.  नितीशकुमारमुक्त सरकार बनविण्याची चिराग यांची अपेक्षा होती. मात्र तेच आता आमदारमुक्त झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com