मोठी बातमी : विधानसभाध्यक्षांची खुर्ची धोक्यात; ‘महाआघाडी’ने मांडला अविश्वास ठराव

Nitish kumar | JDU | Bihar politics : ठराव संमत करून विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटविता येऊ शकते
BJP
BJPSarkarnama

पाटणा : बिहारमधील सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांची खुर्ची धोक्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) - उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी महाआघाडीने सिन्हा यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. सिन्हा हे सध्या भाजपचे आमदार आहेत. विधिमंडळ सचिवालयाला सादर केलेल्या याबाबतच्या नोटिशीवर महाआघाडीतील विविध घटक पक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे संयुक्त जनता दलाने (जेडीयू) म्हटले आहे. (Bihar Politics Latest Update)

दरम्यान माध्यमांशी बोलताना सिन्हा यांनी या अविश्वास ठरावावर बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, मी सध्या घटनात्मक पदावर असल्याने बाहेर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपशी काडीमोड घेवून राजदच्या पाठिंब्यावर सलग आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी भाजपविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. (Nitish Kumar form Government with RJD) म

BJP
मी असो की पंकजा... गोपीनाथ गटातील सर्व जण बाजूला पडले : एकनाथ खडसे

विधिमंडळामध्ये नितीशकुमार सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार असून त्याचवेळी सिन्हा यांच्याबाबतच्या ठरावावर फैसला होऊ शकतो, असे ‘जेडीयू’चे नेते विजयकुमार चौधरी यांनी स्पष्ट केले. बहुमत चाचणीसाठी बिहार विधिमंडळाचे विशेष अधिवेशन २४ ते २५ ऑगस्ट या काळामध्ये होईल. सरकारला २४ रोजीच बहुमत सिद्ध करावे लागेल. नियमानुसार विधिमंडळामध्ये एक वेगळा ठराव संमत करून विधानसभा अध्यक्षांना त्यांच्या पदावरून हटविता येऊ शकते, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.

BJP
महाविकास आघाडीतील धुसफूस टोकाला : अजित पवार, जयंत पाटील मातोश्रीवर

तेजप्रताप यांना हवे आरोग्यमंत्रालय

सत्तास्थापनेनंतर बिहारमध्ये आता मलाईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नितीश आणि तेजस्वी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून त्यासाठी अनेक बड्या नेत्यांनी लॉबिंग करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे मोठे सुपुत्र तेजप्रताप यादव यांनी आरोग्य मंत्रालय मागितले आहे. याआधी सर्वप्रथम मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य खातेच सोपविण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com