Nitish Kumar: अमृता फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा 'राष्ट्रपिता' उल्लेख; नितीशकुमार म्हणाले...

Nitish kumar On Amruta Fadnavis Statement : नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं?
Nitish Kumar, Amruta Fadnavis
Nitish Kumar, Amruta Fadnavis Sarkarnama

Nitish kumar On Amruta Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होतं. त्यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नितीशकुमार यांनी अमृता फडणवीसांच्या पंतप्रधान मोदींवरील विधानावर भाष्य केलं आहे. नितीशकुमार म्हणाले, माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. मात्र, नंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट मी समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील महात्मा गांधींचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. मात्र, आता काही लोक राष्ट्रपिताविषयी काय बोलत आहेत हे सर्वजण पाहत आहेत.

Nitish Kumar, Amruta Fadnavis
Eknath Shinde : ठाकरेंपाठोपाठ शिंदेंकडूनही शिवशक्ती - भीमशक्तीचा प्रयोग? नेमकं काय घडलं?

आता हे म्हणत आहेत की, जुन्या राष्ट्रपितांना विसरू जा नवे राष्ट्रपिता आले आहेत. पण नव्या भारताचे आता नवे पिता आले आहेत. या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? त्यांनी काही काम केलंय का? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेलाय? असा उपरोधिक टोलाही नितीश कुमारांनी मोदींना लगावला आहे.

Nitish Kumar, Amruta Fadnavis
Sandeep Singh : विनयभंगाचा आरोप होताच मंत्र्याचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता असून महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत असं विधान केलं होतं. तसेच मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही असं देखील यावेळी त्या म्हणाल्या होत्या.

मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाही. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते असेही अमृता फडणवीसांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in