आम्ही राहू, न राहू, पण 2024 मध्ये...; मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीशकुमार गरजले!

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama

Bihar Politics : पाटणा : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे (Bjp) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्यावर नितीशकुमार यांनी पलटवार केला. काही लोकांना वाटते की विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र, आता आम्हीही विरोधी पक्ष आहोत, असेही नितीशकुमार म्हणाले.

तसेच 2014 मध्ये आलेले 2024 मध्ये राहतील तर ना? आम्ही राहू, न राहू, पण 2024 मध्ये ते राहणार नाही, असा इशारा नितीशकुमार यांनी दिला. विरोधी पक्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र यावे, असे आवाहन मी करत आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान पदाचे आपण दावेदार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

CM Nitish Kumar
नितीशकुमारांचे मुख्यमंत्रीपदी पुनरागमन : २४ तासांत थाटला तेजस्वी यादवांसोबत संसार

जेपी नड्डा यांनी सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील, फक्त भाजप राहील. महाराष्ट्रात शिवसेनाही संपुष्टात येईल, असे विधान केले होते. त्यानंतर बिहारमध्ये सत्तांतर झाल्याने सर्वच विरोधी व प्रादेशिक पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि उपेंद्र कुशवाहा यांनी भाजपवर टीका केली. नितीशकुमार यांनीही नड्डा यांच्या निशाणा साधला आहे. आम्ही राहू, न राहू. मात्र, 2024मध्ये ते सत्तेत राहणार नाहीत, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

CM Nitish Kumar
BJP मित्रपक्षांना संपवतो... नितीशकुमारांचे पाऊल योग्यच : शरद पवार

पवार यांनीही नड्डा यांच्यावर टीका केली. भाजप मित्र पक्षांना संपवण्याचे काम करत असल्याचे ते म्हणाले. पंजाबमध्ये प्रकाश सिंह बादल यांच्यासोबत असेच झाले. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेसोबतही तेच करण्यात आले. आता बिहारमध्ये असच होणार होते. मात्र, महाराष्ट्रात जे झाले, त्यामुळे नितीशकुमार सावध झाले. भाजपसोबत राहिल्यावर आपल्यासोबतही धोका होईल, हे नितीशकुमार यांना कळाले. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा देत भाजपपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in