Bharat Jodo यात्रेत नितीन राऊत गंभीर जखमी

Nitin Raut| नितीन राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती.
Nitin Raut|
Nitin Raut|

Bharat Jodo Yatra तेलंगाणा : राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) 'भारत जोडो' यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) जखमी झाले आहेत. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झाले असताना गर्दीत त्यांना धक्का लागून पडल्याने ते खाली कोसळले, त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय उजव्या हाताला आणि पायालाही इजा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रा तेलंगणात दाखल झाली. नितीन राऊत हे राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. सामान्य जनता, कार्यकर्ते राहुल गांधीं यांच्या भेटीसाठी धडपड करीत होते. या गर्दीतून मार्ग काढत राहुल यांच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली पडले, यात त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली असून डोक्याला आणि हातालाही मार लागला आहे.

Nitin Raut|
जि.प. सभापती निवडणूक : राष्ट्रवादीच्या बंग गटाला धक्का देत, महाविकासचा एकतर्फी विजय!

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते नितीन राऊत म्हणाले की, मी भारत जोडो यात्रेत सहभागी होतो. आम्ही चार मिनार ओलांडल्यावर मी स्टेजकडे जात असताना राहुल गांधींचा ताफा आला, तेव्हा झालेल्या गर्दीमध्ये पोलिसांनी मला धक्काबुक्की केली आणि मी एका बॅरिकेटजवळ पडलो. माझ्या डोळ्याला इजा झाली, रक्तस्त्राव होऊ लागला आणि मला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही देखील भारत जोडो यात्रेत सामील झाल्याचे पाहायला मिळाले. पूजा भट्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती. काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांची छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. तेलंगाणातील यात्रेत राहुल गांधी क्रीडा, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींसह तज्ञांची आणि विविध समुदायांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. तसेच ते तेलंगणातील प्रार्थना हॉल, मशिदी आणि मंदिरांना भेट देणार आहेत. तेलंगणा राज्य काँग्रेसने यात्रेच्या समन्वयासाठी 10 विशेष समित्या स्थापन केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com