भाजपच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बदल अन् गडकरींनी सांगितलं नेत्यांचं दु:ख!

गुजरातमध्ये भाजपकडून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्याआधी कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये तर दोनदा मुख्यमंत्री बदलले गेले.
Nitin Gadkaris comment on politics amid Gujrat CM change
Nitin Gadkaris comment on politics amid Gujrat CM change

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भाजपकडून दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्याआधी कर्नाटक आणि उत्तराखंडमध्ये तर दोनदा मुख्यमंत्री बदलले गेले. अन्य काही राज्यांमध्येही बदलाचे वारे वाहत असल्याची चर्चा आहे. त्यातच केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एक मार्मिक भाष्य केलं आहे. सध्याच्या स्थितीवर हे भाष्य अगदी सूचक असल्यानं त्याची चर्चा आहे. (Nitin Gadkaris comment on politics amid Gujrat CM change)

क्रिकेट हा खेळ कौशल्यावर आधारीत आहेत. त्याप्रमाणे राजकारणातही कौशल्य लागतं, असं सांगत गडकरी म्हणाले. पक्षात, पक्षाबाहेर, परिवारात, मतदारसंघात अशा प्रत्येक ठिकाणी समस्या आहेत. सर्वांसमोर अडचणी आहेत. एकदा एकाने विचारले सुखी कोण आहे. कुणीच हात वर केला नाही. कारण जे आमदार होते ते मंत्री झाले नाहीत, म्हणून दु:खी आहेत. मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं नाही म्हणून ते नाराज होते. ज्यांना चांगलं खातं मिळालं पण ते मुख्यमंत्री बनले नाहीत म्हणून दु:खी आहेत. जे मुख्यमंत्री बनले ते दु:खी आहेत कारण त्यांना ते कधी जातील, याची खात्री नाही,' असं गडकरी यांनी सांगितलं. 

राज्यात कामाचे नसलेल्यांना दिल्लीत पाठवलं जातं!

शरद जोशी हे हास्यव्यंग कवी होते. त्यांनी एक सुंदर कविता केली होती. जे राज्यात कामाचे नाहीत, त्यांना दिल्लीत पाठवलं. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल बनवले. जे राज्यपाल बनले नाहीत, त्यांना राजदूत बनवलं जातं. सर्व पक्षात हे चालतं. मी पक्षाचा अध्यक्ष असताना कुणीही व्यक्ती असं भेटलं नाही, जे दुखी नव्हतं. जो भविष्याची चिंता करतो, तो दु:खी असतो. आयुष्यात खूप संघर्ष असतो. राजकारणही असंच आहे. त्यावर मात करून यशस्वी नेतृत्व होणं, हीच खरी परीक्षा असते, असंही गडकरी म्हणाले.  

राजकारणात कधी हार-कधी जीत, कधी आनंद, मान-सन्मान मिळतो. तर कधी निराशा येते. राजकारणाचा अर्थ काय आहे, यावर विचार करावा लागेल. राजकारण हे सामाजिक, आर्थिक परिवतर्नाचे प्रभावी साधन आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीचं परिवर्तन करून राष्ट्र घडवणे, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. राजकारणात तर राजकारण होणारच. आजकाल राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण समजलं जात आहे. आपण इथे मंत्री बनण्यासाठी किंवा पोलिस सॅल्युट मारतील म्हणून आलो नाही. देशातील गरिबी, बेरोजगारी, महागाईमधून जनतेला मुक्ती देऊ इच्छितो, असंही गडकरी यांनी स्पष्ट केलं.  

समाजाचं कल्याण करणाऱ्या क्षेत्राचं गुणात्मक परिवर्तन करायचं आहे. मतभेद असले तरी चालतील मनभेद होऊ नयेत, असं अटबिहारी वाजपेयी म्हणायचे. विचारधारेचा सन्मान करणं, हा लोकशाहीचा आत्मा आहे. दोष जनतेला देऊन चालणार नाही. राजकारण्यांना स्वत:कडं पहायला हवं. आपण जेवढे चांगले तेवढी लोकशाही चांगली असेल. विचारधारेशी आपण प्रामाणिक राहायला हवं. आपण कसा वागतो, यावरच लोकशाहीचं भविष्य अवलंबून असेल, असंही गडकरी यांनी नमूद केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com