हप्त्यावर टिव्ही आणायला गेलेले गडकरी रस्त्यांसाठी नवी आयडिया घेवून आले

Nitin Gadkari PWD Ministerअसताना हप्त्यावर टिव्ही खरेदी करण्यासाठी पोहचले होते
Nitin Gadkari 1995

Nitin Gadkari 1995

Sarkarnama

मुंबई : आपल्या साध्या राहणी आणि दिलखुलास वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज त्यांच्या साधेपणाचा आणखी एक किस्सा महाराष्ट्रासमोर आणला. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये (Hotel Grand Hayat) पार पडलेल्या 'गुंतवणूकीच्या संधी' या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गडकरी यांनी ते राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हप्त्यावर टिव्ही खरेदी करण्यासाठी पोहचले होते, असे सांगत याच कल्पनेवरुन आपल्याला देशात रस्ते आणि बोगदे हप्त्यावर बांधण्याची कल्पना सुचली असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी म्हणाले, देशात दोन गोष्टींसाठी फारसे प्रयत्न करण्याची गरज नसते. एक म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी म्हणजे ऑटोमोबाईल ग्रोथ. आज परिस्थिती अशी आहे की गुंतवणूकदार स्वत:हून गुंतवणुकीसाठी सरकारकडे येतात. पण १९९५ मध्ये अशी परिस्थिती होती की, आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो. त्यामुळे त्यावेळी नुकताच नवीन नवीन आलेला लॅपटॉप घेवून लोकांकडे पैशांसाठी प्रेझेंटेशन देत फिरायचो. याची आयडियाही आपल्याला एका टिव्ही दुकानात हप्त्यावर टिव्ही खरेदी करण्यासाठी गेल्यावर सुचली होती.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari&nbsp;1995</p></div>
एसटीत नवीन भरती सुरु केली तर... अजितदादांचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

गडकरी म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो तेव्हा बाजारात एक टिव्ही आला होता. मी पुण्यात एका दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हणालो मला इंस्टॉलमेंटमध्ये टिव्ही द्या. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. त्या दुकानदाराला समजले तेव्हा त्याला कदाचित हप्त्याचे पैसे येणार नाहीत असे वाटले म्हणून तो म्हणाला, साहेब मी तुम्हाला नवीन पीस आला की देतो पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही. मात्र त्याचवेळी मनात विचार आला की टिव्ही जर इंस्टोलमेंटवर मिळू शकत असले तर रोड का नाही मिळत? आणि यातूनच पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवल्याचे नितीन गडकरींनी सांगितले.

<div class="paragraphs"><p>Nitin Gadkari&nbsp;1995</p></div>
सुहास दाशरथेंना मुंबईचा ‘गॉडफादर’ मिळालाच नाही !

आता १२ तासांमध्ये रस्त्याने मुंबई आणि दिल्लीला जाता येते. अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या, त्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त उदाहरण आहे असे प्रकल्प मार्गी लावता येतात. तसेच गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com