NIA Raid : एनआयए'चे छापे मित्राला वाचवण्यासाठी: प्रियांका गांधीचा गंभीर आरोप

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)आज (२१ फेब्रुवारी) सकाळी सात राज्यांतील ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकले.
NIA Raid | Priyanka Gandhi
NIA Raid | Priyanka Gandhi Sarkarnama

NIA Raid : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA)आज (२१ फेब्रुवारी) सकाळी सात राज्यांतील ७० हून अधिक ठिकाणी छापे टाकले. गुंड आणि गुन्हेगारी सिंडिकेटशी संबंधित प्रकरणात हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने ज्या राज्यांमध्ये छापे टाकलेत त्यात पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. याशिवाय एजन्सीने दिल्ली आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशांमध्येही तपास सुरू केला आहे.

एनआयएचे पथक पंजाबमधील जास्तीत जास्त 30 ठिकाणी छापे टाकत असल्याची माहितीही समोर आली आहे. एनआयएचा हा छापा म्हणजे गुंडांच्या नेटवर्कवरील कारवाईची चौथी फेरी असल्याचेही सांगण्यात येत आहे. याआधीही एजन्सीने वेगवेगळ्या राज्यात छापे टाकले आहेत. याशिवाय एनआयएच्या पथकाने गुजरातमध्येही छापेमारी केली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी कुलविंदरच्या गांधीधाम परिसरात हा छापा टाकण्यात आला आहे. कुलविंदरवर बिश्नोई टोळीच्या लोकांना आश्रय दिल्याचा आरोप आहे. तर कुलविंदरचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांशीही संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.

NIA Raid | Priyanka Gandhi
Chinchwad By- Election : पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी पण बंडखोरीची हॅट्रिक करणाऱ्या कलाटेंवर कारवाई नाही...

दरम्यान, या सर्व प्रकरणावर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे अधिवेशनात अडथळा आणण्यासाठी आणि अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ही छापेमारी करण्यात येत आहे. "पंतप्रधानांचे मित्र गौतम अदानी यांच्यावर शेल कंपन्यांच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आणि इतर अनेक गंभीर आरोप झाले, परंतु तुम्हाला याची चौकशी करताना कोणतीही एजन्सी दिसली का?" असे ट्विट करत प्रियांका गांधीनी प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच, काँग्रेसच्या अधिवेशनातील अडथळा आणि मोदीजी आणि त्यांचे मित्र यांच्यातील संबंधांवर उठलेल्या आवाजावर एजन्सीने कारवाया केल्या का? असंही त्यांनी विचारलं आहे. तसेच, काँग्रेस देशाच्या प्रश्नांवर न घाबरता आवाज उठवत राहील. काँग्रेसच्या अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्याचा संकल्प करु, " असे आवाहनही प्रियांका गांधींनी केलं आहे.

इतकेच नव्हे तर, केंद्रांच्या हातच्या बाहुल्या असलेल्या एजन्सींचा धाक दाखवून तुम्ही देशाचा आवाज दाबू शकत नाही. पंतप्रधानांचे मित्र गौतम अदानी यांची संपत्ती 2.5 वर्षात 13 पटीने वाढली, पण देशातील 72% लघु उद्योगांचा व्यवसाय वाढला नाही, 3 वर्षात 1.12 लाख रोजंदारी कामगारांनी आत्महत्या केल्या, गेल्या 1 वर्षात 10,600 एमएसएमई बंद झाले... फक्त मित्राला आधार दिला, मित्र विकसित केला." अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com