'दहशतवाद्यांच्या हाती नवीन तंत्रज्ञान पडणे चिंताजनक'

पाकिस्तानसारख्या देशांनी दहशतवादाला 'सरकारमान्य अनुदानित उद्योग' बनविले
Terrorist
TerroristSarkarnama

नवी दिल्ली : जगातील अतिरेकी गटांच्या हातात ‘ड्रोन' व ‘टुलकीट'सारखे नवीन तंत्रज्ञान येणे जागतिक समुदायासाठी चिंताजनक असल्याचा भारताने पुनरूच्चार केला आहे. अतिरेकी गटांकडून होणारा नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर थांबवण्याच्या उपाययोजनांवर जगाने तातडीने लक्ष केंद्रित केले पाहिजे, यावर परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज भर दिला.

पाकिस्तानसारख्या देशांनी दहशतवादाला 'सरकारमान्य अनुदानित उद्योग' बनविले आहे, अशीही बोचरी टीका त्यांनी केली. संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांनंतरही विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका वाढत असल्याचे ते म्हणाले.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीच्या विशेष बैठकीच्या आजच्या दुसऱया दिवशी भारताने, दहशतवादाचा फैलाव करणाऱया देशांबाबत जगाला पुन्हा सावधतेचा इशारा दिला. गेल्या दोन दशकांमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दहशतवादाला ‘राजाश्रय' देणाऱया देशांवर निर्बंध लादण्यासारखे महत्त्वाचे ‘फ्रेमवर्क' विकसित केले आहे. तरीही विशेषत: आशिया आणि आफ्रिकेत दहशतवादाचा धोका वाढतच चालला आहे. मुक्त समाजाच्या लोकाचाराचा उपयोग स्वातंत्र्यासाठी केला जाऊ शकतो. सहिष्णुतेवर हल्ला करण्यासाठी आणि प्रगती रोखण्यासाठी नव्हे, असेही जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले.

Terrorist
भाजप खासदाराला अधिकारी चांगलाच भिडला; आपली बाजू मांडण्यासाठी चक्क अंघोळचं केली

जयशंकर म्हणाले की, सुरक्षा परिषदेतील आमच्या (भारताच्या) सध्याच्या कार्यकाळात दहशतवाद हा सर्वोच्च प्राधान्यक्रम बनला. म्हणूनच युनो ने भारताच्या राष्ट्रीय राजधानीत दहशतवादविरोधी समितीची ही विशेष बैठक बोलावली आहे. आजच्या काळात दहशतवादी आणि दहशतवादी गटांच्या सध्याच्या टूलकिटमध्ये समाजाला अस्थिर करण्याच्या उद्देशाने हिंसेचा प्रचार, कट्टरपंथीयता आणि कारस्थानी सिद्धांतांचा प्रसार करण्यासाठीची इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ही शक्तिशाली साधने बनलीत हे चिंताजनक आहे.

जयशंकर यांनी पाकिस्तानचा स्पष्ट संदर्भ देताना स्पष्ट केले की ज्या देशांनी दहशतवादाला राज्य-अनुदानित उद्योग बनवले आहे अशा देशांना इशाराची दहशतवादविरोधी निर्बंध व्यवस्था प्रभावी आहे. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात गंभीर धोक्यांपैकी एक आहे. जगभरातील अतिरेक्यांच्या गटांकडून नवीन तंत्रज्ञानाच्या गैरवापराचाही मुद्दा गंभीर बनला आहे. इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे आता दहशतवादी आणि दहशतवादी गटांच्या टूलकिट मध्ये प्रभावी साधन म्हणून उदयास आले आहेत. अलिकडच्या वर्षांत, विशेषत: खुल्या आणि उदारमतवादी समाजात दहशतवादी गटांसह त्यांचे‘वैचारिक' अनुयायी आणि हल्लेखोरांनी या आधुनिक तंत्रज्ञानात प्रवेश मिळवून आपापली क्षमता वाढवली आहे.

दहशतवादी गट आणि संघटित गुन्हेगारी नेटवर्कद्वारे मानवरहित हवाई यंत्रणा वापरल्याने जगभरातील सरकारांच्या चिंतेत भर पडली आहे. सामरिक क्षेत्र, पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक मालमत्तेच्या विरोधात दहशतवादी हेतूंसाठी सशस्त्र ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याच्या भीतीकडे सदस्य देशांनी गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे असेही जयशंकर म्हणाले.

Terrorist
Aditya Thackeray : 'टाटा'नंतर आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर, ठाकरेंचा सरकारवर निशाणा!

संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी आणि दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षा रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, आज विविध प्रकारचे तंत्रज्ञान स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध होत असल्याने दहशतवादी नवीन तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापर करू शकतात, करतात हे दुर्लक्षून चालणार नाही.

दहशतवाद पसरविण्यासाठी अशा हल्लेखोरांकडून नवनवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढला आहे. असे करणाऱ्या दहशतवाद्यांच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी संयुक्त जागतिक कृती आवश्यक असल्याचे युनो चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी नमूद केले. विविध दहशतवादी गटांकडून लोकांना कट्टरपंथाकडे वळविण्यासाठी आणि समाजात तेढ व हिंसाचार पसरविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com