ज्योतिरादित्य शिंदेंचं पंतप्रधान मोदी अन् योगींना असंही गिफ्ट...

उत्तर प्रदेशात भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. अर्थातच या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच देण्यात आलं.
PM Narendra Modi, Yogi Adityanath, Jyotiraditya Scindia
PM Narendra Modi, Yogi Adityanath, Jyotiraditya ScindiaSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपनं (BJP) ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांना धूळ चारली. अर्थातच या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनाच देण्यात आलं. योगींचा नुकताच शपथविधी झाला असून या समारंभाला स्वत: पंतप्रधान उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी योगींनी रेशनधान्यबाबत मोठी घोषणा करत यूपीच्या नागरिकांना दिलासा दिला.

योगींनी रविवारी नागरिकांना आणखी एक खूशखबर दिली. हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी रविवारी मोदी अन् योगी यांच्या मतदारसंघांना अधिक जवळ आणण्यासाठी जणू मोठं गिफ्ट दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरपासून (Gorakhpur) पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीपर्यंत (Varanasi) विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. योगींनी रविवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सेवेचे लोकार्पण केले.

PM Narendra Modi, Yogi Adityanath, Jyotiraditya Scindia
जिल्हा परिषदेपाठोपाठ पालिका निवडणुकीतही भाजप अन् काँग्रेसला झटका

ही सेवा सुरू झाल्यानंतर योगींनी शिंदेचे आभार मान्यता त्यांना शुभेच्छाही दिल्या. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आज बाबा गोरखनाथ यांची भूमी असलेल्या गोरखपूर येथून बाबा विश्वनाथ यांची भूमी असलेल्या वाराणसीपर्यंत नवी विमान सेवा सुरू झाली. ही सेवा सुरू केल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांचे आभार. गोरखपूर आणि वाराणसीला जोडणारी ही सेवा अभिनंदनीय आहे. ही सेवा गोरखपूरसह पूर्व उत्तर प्रदेशाच्या विकासात मोठा हातभार लावेल, असंही योगींनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे आजपासून कानपुर-गोरखपुर-कानपुर, वाराणसी-गुवाहाटी-वाराणसी, हैदराबाद-पुदुचेरी-हैदराबाद, हैदराबाद- जबलपुर- हैदराबाद, पुदुचेरी-बेंगलुरु-पुदुचेरी या विमानसेवाही सुरू करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

पंधरा कोटी जनतेसाठी घोषणा

योगींनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोठी घोषणा करून राज्यातील जनेतला खूषखबर दिली आहे. योगींनी शनिवारी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोफत रेशन देण्याची योजनेला आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा 15 कोटी जनतेला मिळणार आहे. कोरोना संकटाच्या काळात सुरु झालेली ही योजना मार्चमध्ये संपणार होती.

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशातील जनतेला मोफत रेशन आणखी तीन महिने मिळणार आहे. गरीबांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा राज्यांतील जनतेला मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com