उलटा तिरंगा लावल्याने शशी थरुर यांच्या सेल्फीवर नेटकरी भडकले

Shashi Tharoor| congress| शशी थरूर यांनी इटली दौऱ्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
उलटा तिरंगा लावल्याने शशी थरुर यांच्या सेल्फीवर नेटकरी भडकले
Shashi Tharoor|

Shashi Tharoor latest news

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते शशी थरुर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच आता पुन्हा एकदा शशी थरूर यांना त्यांच्या एका सेल्फीमुळे ट्रोल केले जात आहे. शशी थरूर यांनी सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्यांनी आपल्या कपड्यांवर तिरंगा लावला आहे. पण त्यांनी तिरंगा उलटा लावल्याने नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहेत.

सोशल मिडीयावर अनेक लोक शशी थरूर यांना ट्रोल करत आहेत. शशी थरुर यांनी ट्विटरला 9 जून रोजी हे फोटो शेअर केले आहेत.“इतर लोक सहभागी नसलेले सेल्फीही मी घेतले” असं ट्विट त्यांनी केलं आहे. पण शशी थरुरु यांनी त्यांंच्या जॅकेटवरील तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावल्याचे नेटकऱ्यांच्या निदर्शशनास आणून देत त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 Shashi Tharoor|
क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदाराची काँग्रेसमधून हकालपट्टी; आमदारकीही जाणार?

इतकंच नव्हे तर लडाखच्या एका भाजप खासदाराने तर त्यांची खिल्ली उडवली आहे. लडाखचे भाजप खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी तिरंगा योग्य पद्धतीत दाखवण्यासाठी तर शशी थरुर यांचा उलटा फोटो ट्विटरवर शेअर केला. ‘तिरंगा सरळ असायला पाहिजे, खड्ड्यात गेली काँग्रेस’ असं कॅप्शनही त्यांनी फोटोला दिलं आहे.

शशी थरूर यांनी इटली दौऱ्याचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिरंगा उलटा दिसल्यावर लोकांनी काँग्रेस आणि शशी थरूर यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. शशी थरूर यांना ट्रोल करण्यासोबतच काही लोकांनी, चूक झाली आहे, कृपया ती दुरुस्त करा आणि माफी मागा. असा सल्लाही दिला आहे.

- लोकांच्या प्रतिक्रिया

एका यूजरने लिहिले की, 'प्रिय शशी थरूर जी, देशाचा झेंडा सरळ ठेवण्यास तुम्हाला कोणती अडचण होती की तुम्ही देशाचा झेंडा उलटा लावलात?'

सत्येंद्र नावाच्या यूजरने लिहिले की, 'राष्ट्रीय ध्वज कसा लावायचा हे माहीत नसलेल्या या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

प्रवीण शर्मा नावाच्या यूजरने लिहिले की, 'खासदार बनून काही फायदा नाही, तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, फक्त तुम्हीच करू शकता.

'आपल्या देशाचा अभिमान असलेला तिरंगा नेत्यांना सरळ लावायला शिकले पाहिजे. पण जर यांना तिरंगा सरळ आहे की उलटा हेच माहित नसेल तर ते राजकारण कसे करणार,असा सवाल अखिलेश राय नावाच्या युजरने उपस्थित केला आहे. तसेच, हे अत्यंत चुकीचे आहे, ही चूक भारतीय माफ करू शकत नाहीत. असेही अखिलेश यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in