सरदार पटेल, मोटेरा स्टेडियम, नरेंद्र मोदी अन् संघ कनेक्शन... - netizens slams bjp for renaming motera stadium as narendra modi stadium | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

सरदार पटेल, मोटेरा स्टेडियम, नरेंद्र मोदी अन् संघ कनेक्शन...

वृत्तसंस्था
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

जगातील सर्वांत मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन अहमदाबाद येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. यावरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. 

अहमदाबाद : येथील मोटेरा क्रिकेटचे नूतनीकरण करण्यात आले असून, त्याला आता जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनवण्यात आल आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे उद्घाटन झाले. या स्टेडियमचे नाव आधी सरदार पटेल स्टेडियम होते. आता त्याते नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. मोदींचे नाव स्टेडियमला देण्यावरुन नेटिझन्सनी सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. 

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू , अमित शहांचे पुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा हे उपस्थित होते. अमित शहा हेसुद्धा आधी गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. नवीन नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वांत मोठे क्रिकेट स्टेडियम बनले आहे. उद्धाटन झाल्यानंतर आज लगेचच स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामना सुरू झाला आहे. हा कसोटी सामना भारत आणि ब्रिटन यांच्यात आहे. अहमदाबाद शहरात सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलाचे उभारणी करण्याचे नियोजन असून, स्टेडियम हा त्यातील एक भाग आहे. 

या स्टेडियमला मोदींचे नाव दिल्यानंतर सोशल मीडियावर युद्ध सुरू झाले आहे. या निर्णयाचे भाजपने स्वागत केले आहे तर नेटिझन्सनी यावर जोरदार टीका केली आहे. अनेक नेटिझन्सनी यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढले आहे. सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली होती, त्याचाच सूड उगवला जातोय, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेऊन या स्टेडियमला त्यांचे नाव देण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे आत्मस्तुतीचा कळस मानावा लागेल. जगात हयात व्यक्तीचे नाव सार्वजनिक मालमत्तेला देण्याचा हा पहिलाच प्रकार असावा, अशी टीकाही काही नेटिझन्सनही केली आहे. पंतप्रधान मोदी हे गांधींचा तिरस्कार करतात पण तेसुद्धा शेवटी त्यांच्यासारखेच वागू लागले आहेत, असे एका नेटिझनने म्हटले आहे. 

काही नेटिझन्सनी नेत्यांची नावे असलेल्या स्टेडियमची यादी दिली असून, मोदींचे नाव दिले तर बिघडले कुठे, असा सवाल केला आहे. आधी नेत्यांची स्टेडियमला नावे असूनही क्रिकेट संपले नाही मग आताच मोदींचे नाव दिल्यानंतर क्रिकेट संपणार आहे का, असा प्रश्नही काही जणांनी उपस्थित केला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख