केवळ नेताजींमुळेच स्वातंत्र्य मिळालं, हे म्हणणं मूर्खपणाचं! कन्येनंच सुनावलं

देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, 1947 मध्ये तर भीक मिळाली होती, असं वक्तव्य कंगनानं केलं आहे.
Anita Bose Pfaff
Anita Bose Pfaff

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावत (kangana ranaut) हिनं महात्मा गांधी (mahatma gandhi) यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटीशांच्या हवाली करणार होते, असं वादग्रस्त विधान तिनं केलं आहे. यापूर्वी तिनं देशाला 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, 1947 मध्ये तर भीक मिळाली होती, असं वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. आता यावर थेट नेताजींच्या कन्येनंच आपली भूमिका स्पष्ट करत सुनावलं आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना नेताजींच्या कन्या अनिता बोस फाफ (Anita Bose Pfaff) यांनी केवळ नेताजी आणि इंडियन नॅशनल आर्मीमुळे (INA) असा दावा करणं मुर्खपणाचं ठरेल, असं म्हटलं आहे. गांधीजींनी नेताजींसह अनेकांना प्रेरणा दिली. दोघांमधील संबंध ताणलेले होते. आपण नेताजींना आवरू शकत नाही, असं गांधींनी वाटत होतं. पण दुसरीकडे माझे वडील गांधींचा खूप आदर करत होते, असं अनिता बोस म्हणाल्या.

Anita Bose Pfaff
कंगना पुन्हा बरळली ; म्हणाली, ''भगतसिंगांना फाशी द्यावी अशी गांधींची इच्छा होती''

महात्मा गांधी व नेताजी हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे थोर महापुरुष होते. ते एकमेकांच्या साथीशिवाय काही करू शकले नसते. केवळ अहिंसात्मक धोरणामुळे देशाला स्वातंत्र मिळालं, हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या काही सदस्यांकडून केला जाणार दावा चुकीचा आहे. भारताच्या स्वातंत्रलढ्यात नेताजी आणि INA चे किती योगदान आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, असंही अनिता बोस यांनी सांगितलं.

Anita Bose Pfaff
दिल्लीत राष्ट्रवादीची ताकद वाढली; योगानंद शास्त्रींचा पक्षप्रवेश

कोट्यवधी लोकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे. स्वातंत्र्याकडे एकाच दृष्टीने पाहणे भाबडेपणाचे आहे, असल्याचे सांगत देशाला 1947 मध्ये भीक मिळाली, तर 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, या कंगनाच्या वक्तव्याचा समाचार घेतला. दरम्यान, महात्मा गांधींसोबत जवाहरलाल नेहरु तसंच मोहम्मद अली जिन्ना यांनी एका ब्रिटीश न्यायाधीशांसोबत सुभाषचंद्र बोस देशात आल्यानंतर त्यांना सोपवण्यात येईल असा करार केल्याचा दावा कंगनाने केला आहे. महात्मा गांधींना सत्तेची भूक होती असंही म्हटलं आहे.

''सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यांना त्यांच्याकडून कोणताही पाठिंबा मिळाला नाही असा दावा करताना दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते स्वातंत्र्य नाही असं म्हणत अहिंसेची खिल्ली उडवली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामला काही पोस्ट शेअर केल्या असून आपले हिरो निवडताना विचार करा,'' असा सल्ला कंगनाने दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com