योगाचा उगम भारतात नव्हे तर नेपाळमध्ये! पंतप्रधान ओलींचा दावा

योगाचा उगम भारतात नाही, तर नेपाळमध्ये झाला, असा दावा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी केला आहे.
nepal prime minister k p sharma oli says yoga originated in nepal
nepal prime minister k p sharma oli says yoga originated in nepal

काठमांडू : योगाचा (Yoga) उगम भारतात नाही, तर नेपाळमध्ये झाला, असा दावा नेपाळचे (Nepal) पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (K.P.Sharma Oli) यांनी केला आहे. भारताचा (India) स्वतंत्र देश म्हणून जन्मही झालेला नव्हता त्यावेळी नेपाळमध्ये योगाचा उगम झाला, असेही ओली यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अद्यापपर्यंत कोणत्याही तज्ज्ञाने असा दावा केलेला नव्हता.
 
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रोजी पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी योगसत्र आयोजित करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांशी बोलताना ओली म्हणाले की, भारताचा स्वतंत्र देश म्हणून जन्मही झालेला नव्हता त्यावेळी जगाच्या या भागातच योगाचा उगम झाला. तो भाग म्हणजे उत्तराखंड असून, त्यावेळी उत्तराखंड हा भारतात नव्हे तर नेपाळमध्ये होता.  

सुमारे १५ हजार वर्षांपूर्वी शंभूनाथ किंवा शिवाने योगसाधना सुरु केली. त्यानंतर महर्षी पतंजली यांनी योगाची विचारधारा विकसित केली. योगाला आणखी शुद्धता आणि व्यवस्थिपणा देण्याचे काम त्यांनी केले. योग कोणत्याही एका धर्माशी किंवा पंथाशी निगडित नाही, असे ओली यांनी नमूद केले. 

शिवाने पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या दिवशी, म्हणजे सध्याच्या कालगणेप्रमाणे २१ जूनला, योगसाधना करण्यास सुरुवात केली. म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचा आम्हाला आनंदच आहे, असेही ओली यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या कॅप्टन प्रियांका गांधीच...
 
ओली म्हणाले की, योगाचा उगम प्राचीन काळी उत्तराखंडमध्ये, विशेषत: नेपाळमध्ये झाला. त्यावेळी उत्तराखंड हा भारताचा भाग नव्हता. तेव्हा स्वतंत्र देश म्हणून भारताचा जन्मही झालेला नव्हता. तसेच, कपिल मुनींच्या सांख्य तत्त्वज्ञानाचा उगमही नेपाळमध्ये झाला आहे. चरक ऋषींचा जन्म, भगवान रामाचा जन्म हा सुद्धा नेपाळमध्येच झाला आहे. खरी अयोध्यापुरी नेपाळमध्ये असून, वाल्मिकी आश्रम आणि सीतेचे धरणीच्या पोटात जाणे हेही नेपाळमधीलच आहे. 

ओली यांचे विधान पूर्णसत्य नसल्याचे सांगून नेपाळमधील प्रसिद्ध योगाचार्य जी. एन. सरस्वती म्हणाले की, योगाचा उगम भारतवर्षात असलेल्या हिमालयात झाला होता. त्याकाळी या प्रदेशात सध्याचा भारत, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिबेट, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांचा समावेश होता. हिमालयात उगम झालेल्या योगाचा येथेच ध्यानधारणा करणाऱ्या ऋषींनी विकास केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com