Arvind Kejriwal : दिल्ली जिंकल्यानंतर केजरीवाल म्हणतात, आता पंतप्रधान अन् केंद्राचा आशीर्वाद हवा

Arvind Kejriwal : 'दिल्ली ठिक करण्यासाठी मला पंतप्रधान आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवे...'
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama

Arvind Kejriwal News : आज दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये 'आप'ने बहुमत मिळवलं. या विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच 'आप'ने दिल्ली महापालिकेत मिळवलेल्या विजयानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.

केजरीवाल म्हणाले, ''जनतेने याआधी जी जबाबदारी दिली त्यानंतर आम्ही शाळा, रुग्णालये, वीज समस्या आम्ही सर्व ठीक केलं. त्यानंतर आता दिल्लीकरांनी साफ-सफाई करण्याची व पार्क व्यवस्थित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे एवढा मोठा बदल घडवणाऱ्या विजयासाठी सर्वांचे अभिनंदन'', असं केजरीवाल म्हटले आहेत.

Arvind Kejriwal
MCD Election : एमआयएमला एक-दोन जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण आम्ही समाधानी..

''आता जनतेने जबाबदारी दिली. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून काम करायचं आहे. मी सर्व पक्षांच्या उमेदवारांना आवाहन करतो की, राजकारण आजपर्यंतच होतं. पण आता सर्वांनी मिळून दिल्ली व्यवस्थित करायची आहे. यासाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसचे (Congress) सहकार्य हवे आहे. या बरोबरच केंद्र सरकारचेही सहकार्य हवे आहे, असं केजरीवाल म्हणाले.

Arvind Kejriwal
Pune MNS : मलाही वसंत मोरेंची गरज नाही; माझिरे आक्रमक

ते पुढे म्हणाले, ''दिल्ली ठिक करण्यासाठी मला पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारचे आशीर्वाद हवे आहेत. तसेच २५० नगरसेवक विजयी झाले आहेत, ते कोणत्याही पक्षाचे नाहीत. ते दिल्लीतील नगरसेवक आहेत. आता आम्ही दोन कोटी लोकं मिळून दिल्ली स्वच्छ करू, तसेच दिल्लीच्या सरकारप्रमाणे महापालिकेतील भ्रष्टाचारही दूर करू, असंही ते म्हणाले.

Arvind Kejriwal
Vasant More News : मोरे मनसे सोडत नाहीत? कारण...

''देशात सकारात्मक राजकारण वाढल्यावर देश देखील नंबर वन होईल. यामधून हेच सांगायचंय उद्धटपणा करू नका. काहींना असं वाटतं की अपशब्द वापरले तर मतं मिळतात. पण आम्हाला ते करण्याची गरज नाही. त्यामुळे नकारात्मक राजकारण करू नका'', असं म्हणत केजरीवालांनी विरोधकांना टोलाही लगावला. (Arvind Kejriwal News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com