कोरोनाबाधितांच्या मृतदेहांनी गंगा मैली? उत्तर प्रदेश, बिहारमधील जनता भयभीत

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीपात्रात आतापर्यंत सुमारे 100 मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे दोन्ही राज्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
nearly 100 dead bodies found in ganga river in uttar pradesh and bihar
nearly 100 dead bodies found in ganga river in uttar pradesh and bihar

लखनौ : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि बिहारमध्ये (Bihar) गंगा (Ganga) नदीपात्रात आतापर्यंत सुमारे 100 मृतदेह (Dead bodies) आढळून आले आहेत. हे मृतदेह कोरोनाबाधितांचे असल्याची चर्चा असून, यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु, या मृतदेहांच्या चाचणीचे अहवाल हाती न आल्याने ते कोरोनाबाधित (Covid 19) होते की नव्हते हे स्पष्ट झालेले नाही. याची केंद्र सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. 

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. काही राज्यांमध्ये भयावह स्थिती आहे. त्यापैकी बिहार व उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. रुग्णांच्या चाचण्यांपासून ते रुग्णांना बेड मिळणेपर्यंत अनेक अडथळे येत आहेत. आता रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यातही अडथळे येत असल्याची स्थिती आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या रांगा लागत आहेत. त्यातच आता गंगा नदीत सुमारे 100 मृतदेह वाहून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

मृतदेह कोरोनाबाधितांचे आहे की नाहीत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नसला तरी स्थानिक नागरिकांनी हे मृतदेह कोरोनाबाधित रुग्णांचे असावेत, असे म्हटले आहे. प्रशासनाने या मृतदेहांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. याचे अहवाल हाती आल्यानंतर स्पष्टपणे बोलता येईल, अशी प्रशासनाने भूमिका घेतली आहे. 

सुरवातीला बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदी पात्रात 71 मृतदेह वाहून आले होते. नंतर उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे गंगा नदी पात्रात 25 मृतदेह सापडले होते. बिहार व उत्तर प्रदेश सीमेवर गंगा नदीमध्ये मागील काही दिवसांपासून मृतदेह वाहून येत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

आता या संपूर्ण प्रकाराची दखल जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, गंगा नदीत मृतदेह टाकणे हे दुर्देवी आहे. मोदी सरकार गंगेचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. दोन्ही राज्यांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com