Nagaland Assembly Result : नागालॅंड विधानसभेत ६० वर्षांनंतर पोचली महिला; NDPP च्या हेकानी जाखलू ठरल्या पहिल्या महिला आमदार

हेकानी जाखलू ह्या दिमापूर-३ या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या इगेटो झिमोमी यांचा १५३६ मतांनी पराभव केला.
Hekani Jakhlu
Hekani JakhluSarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा सभापती आदी मोठ्या पदांपर्यंत देशातील महिला पोचत असताना ईशान्येकडील नागालॅंड (Nagaland) विधानसभेत (Assembly) गेल्या ६० वर्षांत एकही महिला (Women) आमदार (MLA) निवडून येऊ शकली नव्हती. मात्र, आज इतिहास घडला असून स्वातंत्र्यानंतर तब्बल ६० वर्षांनंतर नागालॅंडच्या विधानसभेत महिला पोचली आहे. नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेकानी जाखलू नागालॅंडच्या पहिल्या आमदार ठरल्या आहेत. (NDPP's Hekani Jakhlu becomes first woman MLA in Nagaland)

ईशान्येकडील नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. या तीनही राज्यांतील जनतेचे डोळे निकालाकडे होते. पण, सर्वाधिक नजर नागालँडकडे होती. नागालँड राज्य १९६३ मध्ये अस्तित्वात आले. त्याला ६० वर्षे झाली. पण आजपर्यंत एकही महिला आमदार निवडून आलेली नव्हती. मात्र, हेकानी जाखलू यांनी इतिहास घडवत प्रथमच नागालॅंडच्या विधानसभेत महिला म्हणून पाऊल ठेवले आहे.

Hekani Jakhlu
Pune News : रासनेंपाठोपाठ गणेश बीडकरांनाही धक्का : या समितीवरील नियुक्ती रद्द; बुट्टे पाटलांना संधी!

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (NDPP) हेकानी जाखलू ह्या दिमापूर-३ या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्यांनी लोक जनशक्ती पक्षाच्या इगेटो झिमोमी यांचा १५३६ मतांनी पराभव केला. सात महिन्यांपूर्वीच राजकारणात प्रवेश केलेल्या ४७ वर्षीय हेकाणी यांना १४ हजार ३९५ मते मिळाली आहे.

कोण आहेत हेकानी जाखलू?

हेकानी जाखलू या व्यवसायाने वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. दिमापूरमधील हेकानी जाखलू यांनी दिल्ली आणि लंडन येथे शिक्षण घेतले आहे. त्यांनी तब्बल १८ वर्षे एनजीओमध्ये काम केले आहे. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर त्या भारतात परतल्या होत्या. त्यांनी सात महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांचे पती अलिजा जाखलू दिमापूरमधील मोठे कंत्राटदार आणि व्यापारी आहेत.

Hekani Jakhlu
Pune News : रासनेंपाठोपाठ गणेश बीडकरांनाही धक्का : या समितीवरील नियुक्ती रद्द; बुट्टे पाटलांना संधी!

आणखी दोन महिला उमेदवार पुढे

साठ विधानसभेच्या जागा असलेल्या नागालँडमध्ये १८४ उमेदवार रिंगणात होत्या, त्यात फक्त ४ महिला होत्या. एनडीपीपीचे सल्हुटुआनो क्रुसे पश्चिम अंगामी जागेवरून, तर भाजपचे काहुली सेमा अटोइझू जागेवरून आघाडीवर आहेत. म्हणजेच त्यांच्या आघाडीचे रूपांतर विजयात झाले, तर नागालँडमध्ये प्रथमच ३ महिला आमदार एकत्र सभागृहात पोहोचतील. दुसरीकडे, काँग्रेसच्या चौथ्या महिला उमेदवार रोझी थॉमसन यांना आतापर्यंतच्या मतमोजणीत 50 मतेही मिळवता आलेली नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com