Nagaland Government : मोठी बातमी ; राष्ट्रवादी भाजपसोबत सत्ता स्थापन करणार?

एनडीपीपीने आपला सलग दुसरा कार्यकाळ सत्ता राखत अनुक्रमे 25 आणि 12 मतदारसंघ जिंकले आहेत.
Nagaland Government :
Nagaland Government :Sarkarnama

Nagaland Government : नागालॅंडच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागालॅंड राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपसोबत सत्तेत बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र राष्ट्रवादीकडून अद्याप या निर्णय़ावर शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपी युतीचे सरकार स्थापन होत आहे. प्रथमच सर्वपक्षीय सरकार स्थापन होत आहे. म्हणजेच राज्यात एकही विरोधी पक्ष राहणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि जेडीयूनेही भाजप आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्या विरोधात आहेत. तरीही जेडीयू आणि राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

Nagaland Government :
Chhatrapati Sambhajinagar: नामांतराचा वाद पेटला; राष्ट्रवादीचे ५० पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार?

नागालँडमध्ये जागा जिंकणाऱ्या सर्व पक्षांनी मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय सरकार स्थापन झाल्यावर राज्यात विरोधक उरणार नाही, हे उघड आहे. खरं तर इथे एका गोष्टीचं सौंदर्य आहे तसंच मजबुरीही आहे. प्रत्यक्षात कोणत्याही विरोधी पक्षाला दोन अंकी जागा मिळालेल्या नाहीत. विरोधी पक्षांमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र राष्ट्रवादीला दहाचा आकडाही स्पर्श करता आला नाही. राष्ट्रवादीने येथे सात जागा जिंकल्या आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्ष म्हणून दावा करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे राष्ट्रवादीने मित्रपक्ष बनणे हिताचे मानले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com