NCP News : मोठी बातमी : भाजपचे पाच आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात ; प्रदेशाध्यक्षांचा दावा

Karnataka Election 2023 NCP News : राष्ट्रवादीकडूनही लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.
Karnataka Election 2023 NCP News
Karnataka Election 2023 NCP NewsSarkarnama

Karnataka Election 2023 NCP News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस, जेडीएस यांनी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एन्ट्री घेतली आहे. राष्ट्रवादी लवकरच कर्नाटक निवडणुकीच्या आखाड्यात आपले उमेदवार उतरविणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एन हरी यांनी शनिवारी माध्यमांना याबाबत माहिती दिली. "आमच्या संपर्कात भाजपचे चार ते पाच आमदार आहेत. ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील. बैगलुरुचे माजी महापौर सुध्दा आमच्या संपर्कात आहेत, असे एन हरी यांनी सांगितले. राष्ट्रवादी लवकरच आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे.

Karnataka Election 2023 NCP News
Karnataka Politics : माजी पंतप्रधानांचा लोकसभेसाठीचा प्लॅन ठरला ; या पक्षासोबत करणार आघाडी..

"कर्नाटक विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस ४० जागा लढविणार आहे. भाजपाला सोडचिठ्ठी देणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारसरणीशी सहमत असणारे अनेक भाजप नेते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत, त्यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात देईल," असे एन हरी यांनी सांगितले.

Karnataka Election 2023 NCP News
Karnataka Election 2023 : भाजपमधून गळती सुरुच ; येदियुरप्‍पांच्या नातवाचा JDS मध्ये प्रवेश ; बहीण भावावर नाराज...

काल (शनिवारी) केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर कर्नाटक निवडणूक कोणत्या चिन्हावर निवडणुका लढणार याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष होतं, या परिस्थिती आता राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.

Karnataka Election 2023 NCP News
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा ; कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत आयोगाने घड्याळ...

घड्याळ चिन्हावर लढणार

कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली आहे. याबाबतची विनंती पक्षाने आयोगाकडे केली होती. निवडणूक आयोगाचा परवानगीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत मोठा दिलासा मिळाला आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com