NCP News : राष्ट्रवादीला धक्का ! महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदाराला न्यायालयानं सुनावली 'ही' शिक्षा

NCP News : आपल्याविरुध्दचं हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित...
Ncp, Mohmmad Faizal
Ncp, Mohmmad Faizal Sarkarnama

NCP MP Mohammed Faizal News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरील संकटं काही थांबताना दिसत नाही. कालच ईडीने राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह घरावर छापेमारी केली असतानाच आता महाराष्ट्राबाहेरील पक्षाचा एकमेव खासदारही चांगलाच अडचणीत आला आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादी खासदार मोहम्मद फैजल यांना न्यायालयाने चार जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.

खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal)आणि इतर आरोपींनी 2009 मधील लोकसभा निवडणुकीवेळी माजी केंद्रीय मंत्री पी.एम. सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी खासदार फैजल यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकऱणात न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Ncp, Mohmmad Faizal
Hasan Mushrif News : सलग पाच वेळा निवडून आलेले हसन मुश्रीफ ED च्या रडारवर कसे आले ? ; ही आहे भाजपची खेळी

लक्षद्वीपमधील कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदाराला 2009 मध्ये चार जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे अशी माहिती संबंधित वकिलांनी दिली.

न्यायालयाच्या निकालावर खासदार फैजल म्हणाले..

कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं खासदार मोहम्मद फैजल यांनी सांगितले. तसेच आपल्याविरुध्दचं हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

Ncp, Mohmmad Faizal
Narendra Dabholkar हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख आवश्यक; कुटुंबियांची विनंती

फैजल राष्ट्रवादीचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार...

खासदार फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार असून सर्वात पहिल्यांदा ते 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर मोहम्मद फैजल 2019 मधील लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला आहे. सध्या ते अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com