NCP National Committee : राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; आव्हाडांवर सोपवली मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी आज (ता. १६ सप्टेंबर) सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली
Dr. Jitendra Awhad
Dr. Jitendra Awhad Sarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) राष्ट्रीय कार्यकारिणी (National Committee) आज (ता. १६ सप्टेंबर) सायंकाळी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली. राष्ट्रीय अधिवेशनात जाहीर झाल्याप्रमाणे शरद पवार (sharad Pawar) हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, तर पटेल हे उपाध्यक्ष असतील. यामध्ये एक उपाध्यक्ष, सहा जनरल सेक्रेटरी, पाच राष्ट्रीय सचिव असणार आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर राष्ट्रवादीने जनरल सेक्रेटरीपदाची जबाबदारी सोपवली आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवण्यात आले आहे. (NCP National Executive Committee announced)

Dr. Jitendra Awhad
सामंतांसारख्या गद्दाराला निवडणुकीत ठेचल्याशिवाय राहायचे नाही : भास्कर जाधवांचा हल्लाबोल

राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या सहीचे पत्रक पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामध्ये सुनील तटकरे आणि जितेंद्र आव्हाड या महाराष्ट्रातील दोघांकडे जनरल सेक्रेटरीपद देण्यात आले आहे. हेमंत टकले यांच्याकडेही राष्ट्रीय सचिवपद देण्यात आलेले आहे. वर्किंग कमिटीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, तटकरे, पटेल यांचा महाराष्ट्रातून समावेश करण्यात आलेला आहे. कायम निमंत्रित सदस्यांमध्ये एकूण १६ जणांना संधी देण्यात आली असून दिलीप वळसे पाटील यांचा त्यात समावेश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून २१ राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेशचे अध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे कायम ठेवण्यात आली आहे. मधल्या काळात अजित पवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्यात आल्यानंतर पाटील हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावर जयंतरावांनी पुण्यात बोलताना मीच पक्षाचा अध्यक्ष असल्याने मी कसा नाराज असेन, असे स्पष्टीकरण दिले हेाते. या कार्यकारिणीचे वैशिष्ट्य म्हणजे जितेंद्र आव्हा यांच्यावर प्रथमच राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आली आहे.

Dr. Jitendra Awhad
देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत तुम्हाला झापलं का? अब्दुल सत्तार म्हणाले...

दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्षपद खासदार फौजिया खान यांच्याकडे कायम ठेवण्यात आले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे युवती काँग्रेस, धीरज शर्मा यांच्याकडे युवक अध्यक्षपद, सोनिया दुहान यांच्याकडे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com