राष्ट्रवादीला मोठा धक्का : वरिष्ठ आमदाराने तडकाफडकी पक्ष सोडला

पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून ते २०१२ व २०१७ मध्ये ‘राष्ट्रवादी’च्या तिकिटावर निवडून आले होते.
Kandhal Jadeja
Kandhal JadejaSarkarnama

पोरबंदर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) गुजरातमध्ये (Gujarat) मोठा झटका बसला आहे. पक्षाचे एकमेव आमदार आणि २०१२ पासून गुजरात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे कंधाल जडेजा (Kandhal Jadeja) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वरिष्ठ आमदाराने पक्ष सोडल्याने गुजरातमध्ये राष्ट्रवादीला हदरा बसला आहे. (NCP MLA from Gujarat resigns from the party)

आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कंधाल जडेजा यांना उमेदवारी नाकारल्‍याने ते नाराज झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या नावाची शिफारस केली नसली तरी जडेजा यांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पोरबंदर जिल्ह्यातील कुटियाना मतदारसंघातून ते २०१२ व २०१७ मध्ये ‘राष्ट्रवादी’च्या तिकिटावर निवडून आले होते.

Kandhal Jadeja
Bhima Sugar : धनंजय महाडिक गटाचा मोठा विजय; ६५०० च्या फरकाने सर्व जागांवर मारली बाजी

गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत जडेजा यांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पण, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची युती असून कुटियानातून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. या दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती गेल्या आठवड्यात जाहीर केली आहे. त्याच दिवशी जडेजा यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ‘राष्ट्रवादी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडून अर्ज भरण्यास परवानगी घेतली असल्याचा दावा जडेजा यांनी केला होता.

Kandhal Jadeja
Bhima Sugar : मोहोळची लिट्‌मस टेस्ट ‘डिस्टिंक्शन’मध्ये जिंकली; आता भीमा पॅटर्न कायम राहणार : उमेश पाटलांची प्रतिक्रिया

कंधाल जडेजा यांनी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष जयंत पटेल उर्फ जयंत बोस्की यांना सोमवारी पत्र पाठविले आहे. ‘राष्ट्रवादी’ने त्यांना तिकिट नाकारल्याने पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राष्ट्रवादी या वेळी उमरेठ (जि. आनंद), अमहदाबादमधील नरोदा आणि देवगड बारिया (जि. दाहोद) अशा तीन जागा लढविणार आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर जडेजा हे अपक्ष म्हणून किंवा दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवितील, असा अंदाज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com