राष्ट्रवादीचे मंत्री अडचणीत; विनयभंग प्रकरणात लोकायुक्तांकडे तक्रार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.
NCP Minister A K saseendran accused of intervening in molestation case
NCP Minister A K saseendran accused of intervening in molestation case

तिरूअनंतपुरम : केरळ सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव मंत्री असलेले ए. के. शशींद्रन अडचणीत सापडले आहेत. एका विनयभंगाच्या प्रकरणात शशींद्रन यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. याबाबतची तक्रार आता थेट लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. (NCP Minister A K saseendran accused of intervening in molestation case)

केरळातील कोल्लम जिल्ह्यातील कुंदरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलीने तक्रार दिली आहे. पक्षाचे राज्य कार्यकारिणीतील सदस्य जी. पद्माकरन यांच्याविरुध्द 28 जून रोजी तक्रार देण्यात आली आहे. वडील राष्ट्रवादीत असले तरी ही मुलगी भाजपची कार्यकर्ता आहे. या प्रकरणात शशींद्रन यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हे प्रकरण राज्यात गाजत असून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच काँग्रेससह इतर विरोधी पक्षही मैदानात उतरले आहेत. भारतीय राष्ट्रीय जनता दलाचे युवक सरचिटणसी नवाझ यांनी याप्रकरणी थेट लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे. शशींद्रन यांनी मंत्रिपदावरून हटवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना द्यावेत, अशी मागणी या तक्रारीत करण्यातआली आहे. शशींद्रन यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याने त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असे नवाझ यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

दरम्यान, पिडीतेच्या तक्रारीनुसार, पद्माकरन यांनी 6 मार्च रोजी त्यांच्या दुकानात गेल्यानंतर वाईट भावनेतून हात आपला हात पकडला. मागील वर्षी आपण भाजपच्या तिकीटावर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवली होती. भाजपने त्यासाठी पैसे दिले असतील तर आम्हीही देतो, असे ते म्हणाले होते. त्यानंतरही पोलिसांत तक्रार करणार नव्हते. पण त्यांनी सोशल मीडियातूनही आपल्याविषयी अपमानास्पद विधानं केल्यानं तक्रार केल्याचे पिडीत मुलीने म्हटलं आहे. 

या तक्रारीनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी वनमंत्री शशींद्रन व वरकला रविकुमार यांच्या सांगण्यावरून आपल्याला फोन करत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शशींद्रन यांनी आपल्या वडिलांना स्वत: फोन करून हे प्रकरण योग्यप्रकारे मिटवण्यास सांगितल्याचा आरोप मुलीने केला आहे. 

शशींद्रन व मुलीच्या वडिलांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राज्यात हे प्रकरण गाजू लागले आहे. दरम्यान, शशींद्रन यांनी मुलीची तक्रार विनयभंगाची असल्याबाबत आपल्याला माहिती नव्हते. पक्षातील दोन कार्यकर्त्यांमधील हा वाद असल्याचे आपल्याला वाटले होते. विनयभंगाबाबत समजल्यानंतर पुन्हा फोन केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com