राम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे! - ncp leader jitendra awhad slams bjp over ram mandir land scam | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 जून 2021

राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून राजकारण तापलं आहे. या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. 
  

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) केला आहे. या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. 

राम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आपचे खासदार संजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झआले आहे. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. 

मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अन्सारी आणि तिवारी यांच्याकडून ही जमीन जादा किमतीला विकत घेतल्याचा आरोप होत आहे. मंदिर ट्रस्ट आणि भाजपचे नेते यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा करीत आहेत. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन भक्तांना लढावं लागत आहे, दुर्दैवी बिचारे, असा चिमटा आव्हाड यांनी काढला आहे. 

हेही वाचा : राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला!

काय आहे आरोप?
राम जन्मभूमीच्या जमिनीलगत असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर काही मिनिटांतच चंपत राय यांनी ट्रस्ट मार्फत हीच जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीत असे काय होते की, दहा मिनिटांतच त्याला सोन्याचा भाव आला, असा आरोप पवन पांडे यांनी केला आहे. 

मंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले 
ट्रस्टने खरेदी केलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने या जमिनीची किंमत अधिक आहे. या जमिनीच्या खरेदीबाबत दहा वर्षांपासून चर्चा सुरू होती. या व्यवहारामध्ये नऊ जण होते. इतर भागातील जमिनीपेक्षा ही जमीन तुलनेनं स्वस्त आहे. व्यवहार झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख