NCP : अजितदादा अंधारात ; बत्तीगुल झाल्याने आयोजकांची धावपळ..

Ajit Pawar : वीज खंडीत झाल्याने मोबाईल टॉर्चची प्रकाशात बैठक घेण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती.
NCP Leader Ajit Pawar
NCP Leader Ajit Pawarsarkarnama

पुणे : विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमात अचानक वीज खंडीत झाल्याने आयोजकांची धावपळ झाली. आज (रविवारी) बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित कार्यक्रमात हा प्रकार घडला. (NCP Leader Ajit Pawar news update)

सुमारे दहा मिनिटं वीज खंडीत झाल्याने मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात बैठक घेण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली होती. पाच ते दहा मिनिटांनंतर वीज आल्याने नियोजनाप्रमाणे बैठक पुन्हा सुरु झाली.

अजित पवार हे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. पुढील वर्षातील क्रीडा धोरण कसं असावं, यासाठी क्रीडा संघटकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आल होतं. या बैठकीसाठी अजित पवार उपस्थित होते, यावेळी अचानक वीज खंडीत झाल्याने सुमारे दहा मिनिटं गोंधळ उडाला, अजित पवार हे अंधारातच बसून होते.

NCP Leader Ajit Pawar
Congress President : अखेर ठरलं, राहुल गांधींनाच अध्यक्ष करा ; बैठकीत प्रस्ताव मंजूर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वेदांता प्रकल्प आणि मंत्रिमंडळ विस्तार वरून शिंदे-फडणवीस सरकारवर नुकताच निशाणा साधला. शिंदे गटात गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटलं की त्यांचे धाबे दणाणते. Eknath Shinde यांनी बंड केल्यानंतर गुजरातला जाणाऱ्या आमदारांमध्ये जळगाव, औरंगाबादचे जास्त आमदार होते. शिंदे सरकारची सध्या महाराष्ट्रात बनवाबनवी सुरू आहे,अशी टीका त्यांनी जळगाव येथे केली.

मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता उठण्याच्या वक्तव्यावरून अजितदादांनी चांगलेच टोमणे मारले. एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत काम करतो मग ते झोपतात कधी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com